• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • 'भाजपमध्ये मोदींना हटवून गडकरींना पंतप्रधान करण्याची चर्चा', काँग्रेसच्या नेत्याचा मोठा खुलासा

'भाजपमध्ये मोदींना हटवून गडकरींना पंतप्रधान करण्याची चर्चा', काँग्रेसच्या नेत्याचा मोठा खुलासा

'आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय. मी गडकरी यांच्या विरोधात लढलो, त्यावेळी...'

 • Share this:
  मुंबई, 19 मे : 'भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Pm Narendra Modi) हटवून नितीन गडकरी (Nitin Gadakari) यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा सुरू आहे. आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय' असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. केंद्राने खताच्या किंमतीत वाढ केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नाना पटोले यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 'भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवून नितीन गडकरी यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा सुरू आहे. आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय. मी गडकरी यांच्या विरोधात लढलो, त्यावेळी त्यांनी भावी पंतप्रधान म्हणून मतं मागितली होती म्हणून आनंद आहे, असं म्हणत भाजपवर निशाणा साधला. Yuck! सकाळी उठताच स्वतःची लघवी पिते ही महिला; कारण वाचून तर बसेल आणखी धक्का 'केंद्र सरकारने खत दरवाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, खत दरवाढ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस रस्तावर उतरले. तहसील कार्यालय येथे घंटानांद केला जाईल. केंद्र सरकारला जाणीव करून द्यावे यासाठी आंदोलन काँग्रेस करेल, असा इशारा नाना पटोले यांनी दिली. 'तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक भागात नुकसान झाले आहे. मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वड्डेटीवार आणि अस्लम शेख हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे', अशी माहितीही नाना पटोले यांनी दिली. महाराष्ट्राबाबत पंतप्रधानांचा भेदभाव का? - नवाब मलिक दरम्यान, महाराष्ट्रातही तौक्ते वादळ आले मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधान भेदभाव का करत आहेत, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

  Ball Tampering प्रकरणात ऑस्ट्रेलियन बॉलर्सना डिव्हिलियर्सने फटकारले, म्हणाला...

  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तोक्ते वादळाने नुकसान झालेल्या दीव-दमण आणि गुजरातचा हवाई दौरा करणार आहेत. महाराष्ट्रात तोक्ते वादळ येऊन नुकसान करुन गेले आहे मग महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत. महाराष्ट्राबद्दल असलेल्या या भेदभावाबद्दल नवाब मलिक यांनी ट्वीट करत सवाल उपस्थित केला आहे.
  Published by:sachin Salve
  First published: