Home /News /mumbai /

मनसेनं कार्यपद्धत बदलली तर.., देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट

मनसेनं कार्यपद्धत बदलली तर.., देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट

सध्या मनसेची अशी कोणतीही विचार किंवा कार्यपद्धती व्यापक नाही. भाजप हा व्यापक विचाराने चालणारा पक्ष आहे

    मुंबई, 09 जानेवारी  : सत्तेवरून पाय उतार झाल्यानंतर भाजप आता विरोधी बाकावर बसली आहे. विरोधी बाकावर बसल्यानंतर भाजपने आता थेट मनसेशी हातमिळवणी करणार असल्याची चर्चा रंगली आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आम्ही मनसेला सोबत घेणार नाही, पण त्यांनी कार्यपद्धत बदलली तर भविष्यात एकत्र येऊ शकतो, असा सुतोवाच केला आहे जिल्हा परिषद निवडणुकीत सपाटून पराभवाला सामोरं गेल्यानंतर भाजपची चिंतन बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मनसेला सोबत घेण्याबाबत पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली. मनसे आणि भाजप एकत्र येण्याचा सध्या कोणताही विचार नाही. मनसेनं आपली विचार आणि कार्यपद्धत जर बदलली तर भविष्यात एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो. पण सध्या मनसेची अशी कोणतीही विचार किंवा कार्यपद्धती व्यापक नाही. भाजप हा व्यापक विचाराने चालणारा पक्ष आहे. भविष्यात जर असा काही विचार झाला तर सर्वांनाच कळेल, असं म्हणत फडणवीस यांनी मनसेला सोबत घेण्याबाबत सूचक विधान केलं आहे. 'जिल्हा परिषदेत जागा कमी झाल्या' जिल्हा परिषद निवडणुकीत काही ठिकाणी धक्का बसला आहे. नागपूरमध्ये काही जागा कमी झाल्या आहे. विधानसभा निवडणुकीतही नागपूरमध्ये आम्हाला धक्का बसला होता. त्याचे हे परिणाम आहे, असं फडणवीस यांनी कबुल केलं. तसंच, 'मागील निवडणुकीत शिवसेना आणि आम्ही एकत्र लढलो होतो. तेव्हा आमच्या  21 जागा होत्या तर सेनेला 8 जागा होता. आता सेनेच्या 7 जागा कमी झाल्या आहे. आमच्याही 6 जागा कमी झाल्यात. परंतु,  जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. आमच्या 52 ते 106 जागा झाल्या. 3 पक्ष एकत्र आल्यानंतर सुद्धा भाजप मोठा पक्ष आहे, असा दावाही फडणवीस यांनी केला. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी विदर्भातून भाजपचा पराभवाला सुरुवात झाली, असं म्हणत जिल्हा परिषदेत भाजपच्या पराभवावर बोचरी टीका केली होती. यावर फडणवीस यांनी पलटवार केला आहे.  'आमचा मोठा पराभव झाला वगैरे अशी काही परिस्थिती नाही. मुळात  दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला, पेढे वाटत फिरू नये, हा प्रत्येकांनी विचार केला पाहिजे.' असा टोला फडणवीस यांनी लगावला. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत परवा कोणतीही बैठक झाली नाही किंवा त्यांची भेटही झाली नाही, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आमच्या भेटीगाठी होत असतात. पण, परवा मात्र राज ठाकरेंसोबत भेट झाली नसल्याचा चक्क दावा देवेंद्र फडणवीस यांनी दैनिक 'लोकमत'च्या 'सरपंच ऑफ द ईयर' या कार्यक्रमात केला आहे. मनसे आणि आमची भूमिका वेगळी आहे. त्यामुळे तूर्तास तरी आमची युती होण्याची कोणती शक्यता नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मात्र, भविष्यात त्यांची भूमिका बदलली तर विचार करता येईल, असे संकेतही देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यात गुप्त बैठक गेल्या काही वर्षांपासून भाजपवर तुटून पडणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आता नवी भूमिका घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती पुढे आली होती. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुढच्या वाटचालीत ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात होती. मुंबईत या दोनही नेत्यांमध्ये दीड तास खलबतं चालल्याची माहिती समोर आली होती. अजित पवारांचा टोला शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने मनसे एकटी पडली होती. तर भाजपलाही नव्या सवंगड्याची गरज होती यातून भाजप आणि राज ठाकरे जवळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर या भेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अजित पवार म्हणाले, ज्या ठिकाणी राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांना भेटले त्याच ठिकाणी मीही राज ठाकरेंना भेटलो होतो. पण त्या दोघांच्या भेटीत नेमके काय झाले ते माहीत नाही, असंही अजित पवार म्हणाले होते.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: MNS, Mumbai, Raj Thackery

    पुढील बातम्या