देश सोडावा लागला तरी वंदे मातरम् म्हणणार नाही-अबू आझमी

"देशातून बाहेर काढले तरी वंदे मातरम म्हणणार नाही, मुस्लिम समाजात एकच देव आहे. त्या अल्लाची आम्ही इबादत करतो"

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2017 07:11 PM IST

देश सोडावा लागला तरी वंदे मातरम् म्हणणार नाही-अबू आझमी

27 जुलै : देश सोडावा लागला तरी वंदे मातरम म्हणणार नाही असं सपाचे नेते अबू आझमींनी म्हटलंय. तर डोक्याला बंदूक लावली तरी वंदे मातरम् म्हणणार नाही अशी ठाम भूमिका एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी मांडलीये.

मद्रास हायकोर्टाच्या आदेशानं वंदे मातरमवर महाराष्ट्रात राजकारण तापलंय. विधासभेत सपा आणि एमआयएमच्या आमदारांनी या निर्णयाला विरोध केलाय.

कुणाची विचारधारा कुणी कुणावर थोपू शकत नाही,  ते म्हणतात म्हणून वंदे मातरम् म्हणणार नाही, माझा धर्म- देशाची घटना आणि कायदाही मला जबरदस्ती करू शकत नाही, माझ्या डोक्यावर बंदूक लावली किंवा तलवार ठेवली तरी वंदे मातरम् म्हणणार नाही अशी प्रतिक्रिया एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी दिली.

तर, देशातून बाहेर काढले तरी वंदे मातरम म्हणणार नाही, मुस्लिम समाजात एकच देव आहे. त्या अल्लाची आम्ही इबादत करतो, त्याशिवाय आम्ही कुणालाही वंदन करत नाही. आम्ही या देशात राहतो हा देश धर्मनिरपेक्ष देश आहे. प्रत्येकाला आपली प्रार्थना करण्याचा अधिकार आहे, पण कुणी कुणावर धार्मिक बाबी लादू शकत नाही अशी भूमिका सपाचे आमदार अबू आझमी यांनी मांडली.

वारीस पठाण आणि अबू आझमी यांना शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनी चांगलंच फटकारून काढलं.  वंदे मातरम हे राष्ट्रगीत नाही पण त्याचे एक महत्व आहे, जे वंदे मातरम म्हणणार नाहीत, त्यांच्या मनात पाकिस्तान आहे. त्यांना या गीताचा आदर करायचा नसेल तर त्यांनी देश सोडून जावे अशा इशारा दिवाकर रावते यांनी दिला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2017 07:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...