S M L

गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नसेल तर ठिय्या आंदोलन करू - उद्धव ठाकरे

राज्याभरात गारपिटीनं शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान केलं आहे. यावर उद्धव ठाकरेंनी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याच्या सूचना केल्या आहेत.

Renuka Dhaybar | Updated On: Feb 13, 2018 10:08 AM IST

गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नसेल तर ठिय्या आंदोलन करू - उद्धव ठाकरे

मुंबई,13 फेब्रुवारी : राज्यात दोन दिवसांत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे 11 जिल्ह्यांतील सुमारे 50 तालुक्यांमधील 1,086 गावांमधील 1 लाख 24 हजार 294 हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली आहेत. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून पंचनामे आणि सर्वेक्षण इत्यादी सरकारी सोपस्काराच्या जंजाळात फार न अडकवता बरबाद झालेल्या शेतकऱ्यांना झटपट मदत कशी देता येईल, याचा विचार आता राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारांनी करायला हवा'', असे म्हटले आहे.

राज्याभरात गारपिटीनं शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान केलं आहे. यावर उद्धव ठाकरेंनी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याच्या सूचना केल्या आहेत. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नसेल, तर तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करावं, असे आदेशही उद्धव यांनी पक्षाच्या तालुका प्रमुखांना दिलेत.

आजच्या सामना अग्रलेखामध्ये याबद्दल लेख लिहण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2018 10:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close