...तर CBI ची टीमही होणार क्वारंटाईन; मुंबई पालिका आयुक्तांचं स्पष्टीकरण

...तर CBI ची टीमही होणार क्वारंटाईन; मुंबई पालिका आयुक्तांचं स्पष्टीकरण

यापूर्वी बिहार पोलिसांच्या एका अधिकाऱ्याला पालिकेने क्वारंटाईन केलं होतं, त्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला होता

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिल्यानंतर मुंबई पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुशांतच्या तपास सीबीआयकडे सुपूर्द केल्यानंतर उद्या सीबीआय अधिकारी मुंबईत दाखल होणार आहेत. मात्र मुंबईत आल्यानंतर सीबीआय अधिकाऱ्यांनाही क्वारंटाईन करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यापूर्वी बिहार पोलिसांच्या एका अधिकाऱ्याला मुंबई पालिकेने क्वारंटाईन केलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांवर सुशांतच्या चाहत्यांनी राग व्यक्त केला होता. विरोधकांनीही निशाणा साधत मुंबई पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर आता सीबीआयच्या अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करणार का? याबाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

याबाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले की जर सीबीआयची टीम केवळ 7 दिवसांसाठी मुंबई आली तर त्यांना क्वारंटाईन करण्यापासून सूट देण्यात येईल. मात्र 7 दिवसांपेक्षा जास्त काळासाठी ते मुंबईत येणार असतील तर त्यांना क्वारंटाईनमधून सूट मिळविण्यासाठी मेल करावा लागेल. त्यानंतर त्यांना क्वारंटाईनमधून सूट दिली जाईल.

सीबीआयच्या टीमकडे सात दिवसांचं रिटर्न तिकीट असेल तर त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार नसल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले. त्याहून अधिक काळासाठी मुंबईत येणार असतील तर त्यांना कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करावे लागेल.

Published by: Meenal Gangurde
First published: August 19, 2020, 7:55 PM IST
Tags: BMCchahal

ताज्या बातम्या