मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

रोहित पवार म्हणाले 'अजितदादा मुख्यमंत्री असते तर आज...'

रोहित पवार म्हणाले 'अजितदादा मुख्यमंत्री असते तर आज...'

'राज्यावर कोरोनाचे संकट आहे, जेव्हा राज्य अडचणीत असतं तेव्हा पैसा कमी असतो, अशा परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी पैसा लागत असतो,  अर्थमंत्र्यांवर मोठी जबाबदारी असते'

'राज्यावर कोरोनाचे संकट आहे, जेव्हा राज्य अडचणीत असतं तेव्हा पैसा कमी असतो, अशा परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी पैसा लागत असतो, अर्थमंत्र्यांवर मोठी जबाबदारी असते'

'राज्यावर कोरोनाचे संकट आहे, जेव्हा राज्य अडचणीत असतं तेव्हा पैसा कमी असतो, अशा परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी पैसा लागत असतो, अर्थमंत्र्यांवर मोठी जबाबदारी असते'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 15 मे : शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसने (Congress) एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार (MVA Goverment) स्थापन केले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले तर अजित पवार (Ajit pawar) हे उपमुख्यमंत्री झाले. पण, मध्येच राष्ट्रवादीच्या गोटातून मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू होते.  'आजच्या कोरोनाच्या काळात अजित पवार हे मुख्यमंत्री असते तर काय परिस्थिती असते? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांना विचारण्यात आला असता मोठ्या खुबीने त्यांनी उत्तर दिले.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दैनिक लोकसत्ता डॉट कॉम'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत रोहित पवार यांनी कोरोनासाठी उपाययोजना, राज्यातील राजकीय परिस्थिती आणि राष्ट्रवादीतील सद्यस्थितीत यावर परखड मतं नोंदवली.

Ball tampering scandal: स्मिथ-वॉर्नरच्या मोहऱ्यानं 3 वर्षांनी सांगितलं सत्य!

राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. राज्याला मदतीची गरज आहे. पण केंद्राकडून पुरेसी मदत दिली जात नाही. केंद्राने एखादी सरकारी कंपनी विकली, तर पैसे आले. आरबीआयकडून सुद्धा कोट्यवधी रुपये घेतले. अशा परिस्थितीत राज्यात पैसा येत नाही. जीएसटी लागू करण्यात आला, पण त्याचे पैसेही राज्याला देण्यात आले आहे. तत्कालिन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्याला कमी पडू देणार नाही, संपूर्ण भरपाई करू, असा शब्द दिला होता. देशभरातून 20 टक्के जीएसटी महाराष्ट्र देत असतो. पण, तरीही राज्याच्या पदरी निराशाच आहे. अशा परिस्थितीत राज्य चालवणे कठीण असते, पण तरीही जबाबदारी सांभाळून काम करत आहे, याचा भार हा अर्थमंत्र्यांवर आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी काका अजित पवार यांचं कौतुक केलं.

'राज्यावर कोरोनाचे संकट आहे, जेव्हा राज्य अडचणीत असतं तेव्हा पैसा कमी असतो, अशा परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी पैसा लागत असतो, तो अर्थमंत्री देतात, त्यामुळे कोरोनाच्या काळात अर्थ खात्याची परिस्थितीत सांभाळणारा व्यक्ती महत्त्वाचा असतो', असंही अजित पवार म्हणाले.

भयंकर! नराधमांनी रुग्णालाही सोडलं नाही, कोरोनाबाधित तरुणीवर सामूहिक बलात्कार

'अजित पवार मुख्यमंत्री असते तर परिस्थिती वेगळी असती का? असं विचारले असता रोहित पवार म्हणाले की, आज मुख्यमंत्री हा महत्त्वाचा विषय नाही. या काळात एकत्र येऊन काम करणे महत्त्वाचे आहे. फडणवीस सरकार होते, तेव्हा कोल्हापूर, साताऱ्यात पूरपरिस्थिती आली होती तेव्हा ते कशा प्रकारे वागले होते, हे लोकांना चांगलेच माहित आहे. महाविकास आघाडी सरकारला शरद पवार, सोनिया गांधी यांचं मार्गदर्शन आहे', असं उत्तर रोहित पवारांनी दिलं.

‘तर मी त्याचे ओठचं कापेन’; सुहानाबद्दल विचारताच शाहरुख संतापला

तसंच, 'राज्य सरकारने कसं काम करावं, त्यांच्या चुकांबद्दल  विरोधकांनी बोललं पाहिजे, हे त्यांचं काम आहे. पण, हे बोलत असताना राज्यातील अडचणी काढता, पण त्याच राज्यातील लोकांनी लशी लागता, रेमडेसीवीर इंजेक्शन लागतात, जीएसटीचा पैसा लागतो, तेव्हा केंद्राकडे मदत मागण्यासाठी कोणताचा प्रयत्न करत नाही. उलट राज्याला अडचणीत आणण्याचे काम विरोधकांकडून होत आहे. केंद्र हा मोठा भाऊ आहे,  निवडणुकांमध्ये भाग वेगळा असता पण अशा परिस्थितीत काम एकत्र काम करण्याची गरज आहे' असा टोलाही रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

First published:

Tags: Rohit pawar