ICICI बँकेचा खातेदारांना Alert; ही काळीजी घ्या, नाहीतर अकाऊंट होईल खाली

ICICI बँकेचा खातेदारांना Alert; ही काळीजी घ्या, नाहीतर अकाऊंट होईल खाली

या तीन गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमचं बँकेचं अकाऊंट सुरक्षीत करा.

  • Share this:

मुंबई 16 ऑक्टोंबर :  Digital Paymentsचं प्रमाण वाढत असल्याने सायबर क्राईमच्या गुन्ह्यातह वाढ होतेय. बँकांचं जवळपास सर्वच कामकाज Online झाल्याने काम जसं सोपं झालं तसच घोटाळ्यांच्या घटनांमध्येही वाढ झालीय. या घटनांमुळे खातेदारांची चिंता वाढली आहे. ही चिंता लक्षात घेऊन ICICI Bank ने खातेदारांसाठी खास सूचना दिल्या आहेत. अशा घोटाळ्यांपासून काय काळजी घ्यावी याची यादीच बँकेने ट्विट करून खातेदारांसाठी दिली आहे. अशा सूचना बँकेकडून वारंवार दिल्या जातात. मात्र त्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे फसवणुकीच्या अनेक घटना घडत असतात. या सूचनांचं काटेकोर पालन केलं तर फसवणुकीच्या घटना कमी होऊ शकतात असं तज्ज्ञांचं मत आहे.

PMC बँक घोटाळा: ह्रदयविकाराने दोन खातेदारांच्या मृत्यूनंतर डॉक्टरची आत्महत्या

Online कामाकाजाचा वेग वाढल्याने फसवणुक करणाऱ्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. त्या ग्राहकांना फोन करून, गोड बोलून, खोटी माहिती सांगून आवश्यक ती माहिती काढून घेतात आणि त्या आधारे ग्राहकांच्या बँक अकाऊंट्समधून रक्कम लंपास केली जाते. त्यामुळे कधीही OTP, Login किंवा Password कधीही कुणाशीही शेअर करू नका असं बँकेने म्हटलं आहे.

सावध राहा! 'कौन बनेगा करोडपती'च्या नावाने फोन करून तरुणाला 40 हजाराला लुटलं

फसवणुकीपासून वाचण्यासाठी या 3 गोष्टींची काळघ्या

1. ICICI बँकेकडून तुम्हाला पैसे मिळणार आहेत अशी Request आली तर ती कधीही स्वीकारू नका. कारण पैसे देण्यासाठी बँक अशी Request कधीही करत नाही. असं काही झालं तर नक्की समजून जा की हा फसवणुकीचा प्रकार आहे.

2. अशी Request करून तुम्हाला पिन नंबर मागितला जाईल. मात्र तुम्ही कधीही तुमचा गुप्त पिन नंबर कुणालाही देऊ नका किंवा कुठेही टाकू नका. कारण असा पिन नंबर टाकल्यानंतर तुमची फसवणूक होऊ शकते.

3. अशी काही विनंती आली तर ती कधीच स्वीकारू नका. उलट त्याच्याविरुद्ध बँक आणि गरज पडली तर पोलिसांमध्येसुद्ध तक्रार करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 16, 2019 10:21 AM IST

ताज्या बातम्या