मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ठाणे जेलमध्ये असलेला इक्बाल कासकर होणार दाऊदचा उत्तराधिकारी

ठाणे जेलमध्ये असलेला इक्बाल कासकर होणार दाऊदचा उत्तराधिकारी

आपला वारस म्हणून इक्बालचं नाव  निश्चित केल्याचं दाऊदने इक्बालचा मुलगा आणि सुनेमार्फत निरोप पाठवून कळवलं.   काही दिवसांपूर्वी इक्बालला ठाण्यात अटक करण्यात आली होती.  ही माहिती ठाणे क्राईम ब्रांचच्या सुमोटो इन्हेस्टीगेशन रिपोर्टमध्ये उघड झाली आहे

पुढे वाचा ...
09 फेब्रुवारी: सध्य  ठाणे जेलमध्ये असलेला  दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर दाऊदचा उत्तराधिकारी होणार असल्याची  माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. इतकंच नाही तर ठाणे जेलमधूनच तो डीगॅंगमध्ये सामील होणार आहे. आपला वारस म्हणून इक्बालचं नाव  निश्चित केल्याचं दाऊदने इक्बालचा मुलगा आणि सुनेमार्फत निरोप पाठवून कळवलं.   काही दिवसांपूर्वी इक्बालला ठाण्यात अटक करण्यात आली होती.  ही माहिती ठाणे क्राईम ब्रांचच्या सुमोटो इन्हेस्टीगेशन रिपोर्टमध्ये उघड झाली आहे. डिसेंबरमध्ये इक्बाल कासकरचा मुलगा मोहम्मद रिझवान आणि रिझवानची पत्नी अनाम झक्की अहमद आणि अनिस इब्राहिमचा मुलगा आरिस हे इक्बाल कासकरला भेटायला ठाणे कारागृहात आले होते.  तेव्हा मोहम्मद रिझवान आणि त्याची बायको  बावा हॉटेलमध्ये राहिल्याचा पुरावा न्युज18 लोकमतच्या हाती लागला आहे. आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून दोघांनीही दिले होते पासपोर्टच्या फोटोकॉपी दिली होती  .त्यानंतर ते एका नातेवाईकाकडेही गेले होते. 26 डिसेंबरला हॉटेलमधून चेकआऊट केल्यानंतर  ते इक्बाल कासकरला भेटले होते. ठाणे कारागृहातूनच माणसं तयार करण्याची सूचनाही दाऊदने इक्बालला केली आहे.  बाहेर पडल्यानंतर अनिस इब्राहिम इक्बालसोबत या नवीन माणसांना  काम देईल. त्यावेळी कोर्टाच्या आवारात त्यांनी इक्बालची भेट घेतली.  27 डिसेंबरला तिघंही पुन्हा दुबईला रवाना झाले. 27 डिसेंबरलाच दाऊदचा वाढदिवस होता, त्यावेळी तो दुबईत असल्याची माहितीही मिळाली आहे . याच वेळी त्यानं इक्बालला त्याचं वारसदार म्हणून जाहीर केलं.  या निर्णयामुळं छोटा शकिल मात्र नाराज झाला आहे.  छोटा शकिल हा डी गँगचा उत्तराधीकारी पदाचा प्रमुख दावेदार मानला जात होता.   या तिघांच्याही विरोधात भारतात काहीही गुन्हे दाखल नसल्यानं त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नाही.
First published:

Tags: D gang, Dawood ibrahim, India, Pakistan, Underworld, इक्बाल कासकर, दाऊद इब्राहिम

पुढील बातम्या