IBNलोकमतचे पत्रकार गणेश बच्छाव यांची चटका लावून जाणारी एक्झिट

ते 37 वर्षांचे होते. गणेश म्हणजे एक उत्साही आणि हरहुन्नरी कलाकार. उत्तम निवेदक, गायक आणि वादनाचे ज्ञान असणारा गणेश पत्रकारितेच्या घबडग्यातही आपल्यात दडलेल्या कलाकाराला जपायचा.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Sep 26, 2017 01:56 PM IST

IBNलोकमतचे पत्रकार गणेश बच्छाव यांची चटका लावून जाणारी एक्झिट

मुंबई, 26 सप्टेंबर : IBN लोकमतचे हरहुन्नरी पत्रकार आणि क्राइम टाइम शोचे सूत्रधार गणेश बच्छाव यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 37 वर्षांचे होते. गणेश म्हणजे एक उत्साही आणि हरहुन्नरी कलाकार. उत्तम निवेदक, गायक आणि वादनाचे ज्ञान असणारा गणेश पत्रकारितेच्या घबडग्यातही आपल्यात दडलेल्या कलाकाराला जपायचा.

लोककला, नाटक, लोकसंस्कृती, आंबेडकरी चळवळ हे त्याच्या आवडीचे विषय होते. दर आठवड्याला त्याचा क्राईम टाइम हा शो प्रसारित व्हायचा. आपल्या मेहनतीनं त्यानं या शोला लोकप्रियता मिळवून दिली होती. अशा या हरहुन्नरी पत्रकाराला आयबीएन लोकमतकडून श्रद्धांजली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2017 01:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...