IBN लोकमतच्या कार्यक्रमात सुकाणूचे काही कार्यकर्ते भडकले, जयंत पाटलांकडून माफी

IBN लोकमतच्या कार्यक्रमात सुकाणूचे काही कार्यकर्ते भडकले, जयंत पाटलांकडून माफी

  • Share this:

10 जून : शेतकरी आंदोलनाच्या बातम्या आम्ही पहिल्या दिवसांपासून दाखवतोय. आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक बातमी, घडामोड तुमच्यापर्यंत पोहोचावी. आजही त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून मुंबईत सुकाणू समितीच्या बैठकीतला वृत्तांत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. त्याचाच एक भाग म्हणून पत्रकार परिषदेत जयंत पाटील आणि रघुनाथ दादा पाटील यांच्यामध्ये जी शाब्दिक चकमक झाली ती दाखवली. त्यानंतर त्याच घटनेवर आम्ही ह्याच नेत्यांनाही बोलतं करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळेस सुकाणू समितीतले काही कार्यकर्ते भडकले आणि त्यांनी चालू कार्यक्रमात गोंधळ घातला. हे कार्यकर्ते जयंत पाटलांचे असावेत. त्यांनीही कार्यकर्त्यांनी थोपवण्याचा प्रयत्न केला. नंतर झालेल्या गोंधळाबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. पाहुयात ह्या कार्यक्रमात नेमकं काय झालं ते..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2017 08:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading