सरकारला पाठिंबा देणारे अदृश्य हात राष्ट्रवादीचे नाहीत-सुनील तटकरे

सरकारला पाठिंबा देणारे अदृश्य हात राष्ट्रवादीचे नाहीत-सुनील तटकरे

  • Share this:

01 नोव्हेंबर : सरकारला पाठिंबा देणारे अदृश्य हात राष्टवादीचे नाहीत असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलंय.

आयबीएन लोकमतच्या न्यूजरुम चर्चा या कार्यक्रमात सुनील तटकरे यांनी आपली भूमिका मांडली. उद्या काहीही झालं तरी, भाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही असं तटकरेंनी स्पष्ट केलं.

दिल्लीत शरद पवारांच्या शब्दाला वजन आहे. वाजपेयींच्या काळात काँग्रेसकडून पवारांवर जास्त टीका झाली पण देशाच्या प्रत्येक पंतप्रधानांला पवारांकडून मार्गदर्शन मिळलं असंही तटकरे म्हटलंय.

सत्तेत राहून विरोध करण्याची शिवसेनेची भूमिका त्यांच्याच अंगलट आल्याचंही तटकरेंनी सांगितलं. प्रभावी विरोधकाची भूमिका आम्ही बजावलीये. शरद पवारांच्यामागे महाराष्ट्राची ताकद उभी करण्यात अपयशी ठरल्याची कबुलीही तटकरे यांनी दिली.

First published: November 1, 2017, 8:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading