IBN लोकमत बालगणेश चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

IBN लोकमत बालगणेश चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

IBN लोकमत प्रस्तुत बालगणेश चित्रकला स्पर्धा 2017 च्या विजेत्यांचा बक्षीस वितरणाचा सोहळा आज मोठ्या दिमाखात पार पडला.

  • Share this:

22 सप्टेंबर : "गणपती बाप्पा मोरया...मंगलमुर्ती मोरया"चा जयघोष करत IBN लोकमत प्रस्तुत बालगणेश चित्रकला स्पर्धा 2017 च्या विजेत्यांचा बक्षीस वितरणाचा सोहळा आज मोठ्या दिमाखात पार पडला. आयबीएन लोकमतचे संपादक प्रसाद काथे यांच्या हस्ते विजेत्या बालगणेशांना सन्मानचिन्ह आणि गिफ्ट व्हाऊचर प्रदान करण्यात आलंय.

गणपती कलेचं दैवत...त्यामुळेच IBN लोकमतनं गणेशोत्सवाच्या काळात शाळेतल्या मुला-मुलींसाठी बालगणेश स्पर्धा आयोजित केली होती. हल्ली मोबाईल गेमच्या जमाण्यात हरवत चाललेलं बालपण कुठे तरी थांबावं या हेतूने सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाचं चित्र काढण्यासाठी आम्ही आवाहन केलं होतं. आमच्या या आवाहनाला उदंड असा प्रतिसाद मिळाला. आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

छोट्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर लाडक्या बाप्पाची एका पेक्षा एक अशी थक्क करणारी सुंदर चित्र रेखाटली. हजारो आलेल्या चित्रांमधून 11 भाग्यवान विजेते निवडण्यात आले होते.

आज या छोट्या बालकलाकांचा गौरव आयबीएन लोकमतच्या कार्यालयात करण्यात आलाय. आयबीएन लोकमतचे संपादक प्रसाद काथे यांच्या हस्ते हा बक्षीस वितरणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी प्रसाद काथे यांच्या हस्ते मेघा विजय बदामे(मुंबई), अनन्या अभय अष्टपुत्रे(ठाणे) , दुर्वा शेखर कोकणे (पुणे), श्रावणी दिनेश जाधव (ठाणे), तनिशा अमित सावंत(मुंबई) आणि तन्मय महेश पेडणेकर (ठाणे) या बालकरांना गिफ्ट व्हाऊचर आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आलंय.

यावेळी आपल्या पाल्याचा गौरव पाहण्यासाठी पालक आवर्जून हजर होते. एकूण 11 विजेते निवडण्यात आले होते. चिमुरड्या बालकलाकारांनीही आपल्याला मिळालेल्या बक्षिसाने भारावून गेले. या वर्षी बालचित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व बालगणेशचं आयबीएन लोकमत परिवाराच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!!

बालगणेश चित्रकला  स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्याचा व्हिडिओ...

First published: September 22, 2017, 8:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading