आम्ही आहोत #News18Lokmat, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चॅनलच्या नव्या रुपाचं अनावरण

आम्ही आहोत #News18Lokmat, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चॅनलच्या नव्या रुपाचं अनावरण

  • Share this:

06 नोव्हेंबर : आजपासून तुमचं लाडकं न्यूज चॅनल आयबीएन लोकमत झालंय न्यूज 18 लोकमत...आता आम्ही नवीन रुपात नवीन ढंगात आपल्यासमोर आलोय. आज संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिमोट दाबून रिलॉन्चिंग केलं. सच्च्या पत्रकारितेप्रतीची कटीबद्धता.. प्रामाणिकपणा आणि अचूक बातमी देणारं तुमच्या हक्काचं चॅनेल हे बिरूद कायम राहील.. जोडीला नवी उर्जा आणि नवी उमेद असेलच. समाजाच्या हितासाठी नेहमी झटणारं आयबीएन लोकमत म्हणजेच आता न्यूज 18 लोकमत आक्रमकपणे जोमाने नवीन रुपात तुमच्या समोर आलंय.

यावेळी सरकारी जाहिरातीतले लाभार्थी हे अस्सल असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.या सोहळ्यात त्यांनी लाभार्थी जाहिरातीच्या वादावर भाष्य केलं. आघाडीच्या सरकारनं जाहिरातींसाठी मॉडेल घेतले. पण आमच्या सरकारनं अस्सल लाभार्थी घेतल्यानं विरोधकांच्या पोटात का दुखलं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. दुसरीकडे शिवसेनेला सरकारच्या प्रत्येक गोष्टीत आक्षेप कसा असतो असा सवाल उपस्थित करीत शिवसेनेच्या सत्तेत राहून विरोध करण्याच्या वृत्तीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

तर जीएसटीमुळे चित्रपट निर्मात्यांचं अतोनात नुकसान होतय. त्यामुळे चित्रपट निर्मितीला जीएसटीतून वगळायला हवं याकरता सगळ्या निर्मात्यांनी एकत्र येऊन आंदोलन उभं करण्याची गरज असल्याचं मत निर्माता दिग्दर्शक महेश कोठारे यांनी व्यक्त केलय. ते न्यूज 18 लोकमतच्या मराठी चित्रपट आणि नाटकाचे खरे मारेकरी कोण या विषयावरील परिसंवादात बोलत होते.

 

 

आपण पाहताय आयबीएन लोकमतचा विशेष कार्यक्रम #अजेंडामहाराष्ट्र2017 LIVE

#अजेंडामहाराष्ट्र2017 LIVE

तिसरे सत्रं-

मराठी नाटक आणि चित्रपटाचे मारेकरी कोण ?

सहभाग-

महेश कोठारे, ज्येष्ठ अभिनेते

अवधूत गुप्ते, गायक-संगीतकार

सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री 

दिलीप ठाकूर, समीक्षक

#अजेंडामहाराष्ट्र2017 LIVE

दुसरे सत्रं- 

फडणवीस  सरकारची कामगिरी दमदार आहे का ?

सहभाग- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

विनोद तावडे, शिक्षणमंत्री

दिवाकर रावते, परिवहणमंत्री 

दुसऱ्या सत्रात कोण काय बोललं ?

आम्ही पीडब्ल्यूडी खात्यात शिस्त आणली, सावित्री नदीवरचा पूल 165 दिवसांत बांधला - चंद्रकांत पाटील

पावसाळा लांबल्यामुळे रस्त्यांवर खड्डे आहेत, '15 डिसेंबरपर्यंत PWDच्या रस्त्यांवर खड्डे दिसणार नाहीत' - चंद्रकांत पाटील

'निलंबन करणं, कारवाईपेक्षा नियोजन करणं जास्त महत्वाचं' ते आम्ही करतोय, रोजगारनिर्मिती हे लक्ष्य - दिवाकर रावते

शिक्षणक्षेत्रात बदल घडवले, 16 लाख मुलांची कलमापन चाचणी केली - विनोद तावडे

फी रेग्युलेशन कायदा आणला, भारतातलं पहिलं पुस्तकाचं गाव तयार केलं - विनोद तावडे

'जे काही चाललेलं आहे ते रावते आणि त्यांच्या पक्षाला मान्य नाही', आज पूर्णपणे महाराष्ट्र खड्ड्यात - धनंजय मुंडे

'15 डिसेंबरपर्यंत खड्डे न बुजल्यास काय करणार?' धनंजय मुंडेंचा चंद्रकांत पाटील यांना सवाल

ठेकेदारांच्या मक्तेदारीला शह दिला - चंद्रकांत पाटील

विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खड्ड्यांवरून खडाजंगी

मी विनोद तावडेंचं अंतर्मन जाणतो - धनंजय मुंडे

धनंजय मुंडेंना तावडेंकडून 'अंतर्यामी' उपाधी

एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करणार का? - मुंडे

7वा वेतन आयोग महामंडळाला लागू होऊ शकत नाही - रावते

----------------------------------------------------------------------

सत्रं पहिले - फडणवीस  सरकारची कामगिरी दमदार आहे का ?

सहभाग-

राधाकृष्ण विखेपाटील, विरोधी पक्षनेते

पंकजा मुंडे, ग्रामविकासमंत्री

सुभाष देसाई, उद्योग मंत्री

राम शिंदे, जलसंधारणमंत्री

पहिल्या सत्रात कोण काय बोलले ?

राज्यात 2408 उद्योगांचे करार केले, आणि 1208 उद्योग सुरू झाले - सुभाष देसाई

जलयुक्त शिवार हे सरकारचं नाही तर जनतेचं यश आहे - पंकजा मुंडे

राज्यात 2408 उद्योगांचे करार केले, आणि 1208 उद्योग सुरू झाले - सुभाष देसाई

कुपोषण पूर्ण नियंत्रणात आहे - पंकजा मुंडे

जे 70 वर्षांत झाले नाही ते 3 वर्षांत होईल असा अनैसर्गिक अपेक्षांना आम्ही सामोरं जातोय- पंकजा मुंडे

जानेवारीपासून कुपोषित बालकांचे अजूनही पैसे दिले नाही - विखे पाटील

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्जमाफीत खोटे प्रमाणपत्र वाटप झाले - विखे पाटील

सरकारकडून तीन वर्षात फक्त इव्हेंट मॅनेजमेंट - विखे पाटील

तीन वर्षात फडणवीस सरकारच्या काळात 10 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या - राधाकृष्ण विखे पाटील

महाराष्ट्रात 50 टक्के एफडीआय गुंतवणूक - सुभाष देसाई

गेल्या तीन वर्षात 1208 उद्योगांना मंजुरी दिली -सुभाष देसाई

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना 6 हजार 608 किमीचे रस्ते लवकरच पूर्ण होणार -पंकजा मुंडे

 

First published: November 6, 2017, 4:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading