आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर यांच्या 22वर्षाच्या मुलाची आत्महत्या

आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर यांच्या 22वर्षाच्या मुलाची आत्महत्या

मन्मथ म्हैसकर हा 22 वर्षाचा होता आणि शिक्षण घेत होता. दरिया महल या इमारतीवरून त्यानं उडी मारून आपलं जीवन संपवलं.

  • Share this:

18 जुलै : आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर  आणि मिलिंद म्हैसकर यांच्या मुलाने आत्महत्या केली. मन्मथ म्हैसकर हा 22 वर्षाचा होता आणि शिक्षण घेत होता. दरिया महल या इमारतीच्या 20व्या मजल्यावरून त्यानं उडी मारून आपलं जीवन संपवलं.

आज सकाळी 7वाजताच्या सुमारास मन्मथ त्याचा मित्र अग्रवाल ह्यास भेटण्याकरता जात आहे असे सांगून घरातून निघाला होता. त्याच्या मृत्यूनं सगळ्यांनाच धक्का बसलाय. आत्महत्येचं नक्की कारण काय हे अजून कळलं नाहीय.

मिलिंद म्हैसकर हे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ आहेत. तर मनीषा म्हैसकर या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2017 12:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading