मुंबई, 9 सप्टेंबर : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री तसेच नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज थेट शरद पवारांनी (Sharad Pawar) केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत ईडीच्या (ED) कारवायांवर भाष्य केलं होतं. तसेच काही प्रश्नही उपस्थित केले होते. त्याच संदर्भात आज किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेत सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून मविआ सरकारमधील मंत्री, नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. या आरोपांनंतर ईडीचा ससेमीराही नेत्यांच्या मागे लागला आहे. राज्यातील नेत्यांची ईडीकडून सुरू असलेल्या चौकशांबाबत भाष्य करताना शरद पवारांनी म्हटलं होतं, इतक्या वर्षात ईडीच्या कारवाया ऐकल्या नव्हत्या. तसेच त्यांनी भावना गवळी यांचेही एकप्रकारे समर्थनच केलं होतं.
भावना गवळी यांच्या 3-4 शिक्षण संस्था आहेत. जिथं गैरव्यवहर झाला असेल तिथे त्याची तक्रार राज्य सरकारच्या गृह खात्यात करता येते. तरी ईडी येऊन चौकशी करते कशी? राज्याच्या अधिकारावर गदा आहे. अधिकाराचा गैरवापर होत असेल तर चुकीचं आहे. कायदेशीर लढाई वर भाष्य करणं योग्य नाही पण इतक्या वर्षात ईडीच्या कारवाया ऐकल्या नव्हत्या असं शरद पवारांनी म्हटलं होतं.
शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज महत्त्वाची बैठक
शरद पवारांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता किरीट सोमय्या हे पत्रकार परिषद घेत शरद पवारांच्या प्रश्नांची आणि टीकेची उत्तरे देणार आहेत. किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर आहेत. दुपारी 3 वाजता किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेणार आहेत. या संदर्भात स्वत: किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.
I will RESPOND to Shri Sharad Pawar's Observations/Criticism on MP Bhavna Gavli Inquiry Today 3pm in Press Conference at Patrakar Bhawan Pune श्री शरद पवारांच्या खा. "भावना गवळी चौकशी वरील निरीक्षण/टीकेला" मी आज दुपारी 3 वाजता पत्रकार भवन पुणे येथे पत्रकार परिषदेत उत्तर देईन
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 9, 2021
असा आहे किरीट सोमय्यांचा पुणे दौरा
11 वाजता मुळशी (पुणे जिल्हा)
3 वाजता पत्रकार भवन पुणे
4.15 तनिष्क शो रूम पुणे
5 वाजता पुणे जिला बँक
5.45 पुणे जिल्हाधिकारी
6.30 सी ए बैठक राहुल कॉम्प्लेक्स कृष्णा हॉस्पिटल शेजारी पौड रोड कोथरूड पुणे
07.30 वाजता मुंबईसाठी रवाना
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kirit Somaiya, Sharad pawar