Home /News /mumbai /

'जय महाराष्ट्र' म्हटल्यामुळे रंगली राजीनाम्याची चर्चा, अखेर संजय राऊत म्हणाले...

'जय महाराष्ट्र' म्हटल्यामुळे रंगली राजीनाम्याची चर्चा, अखेर संजय राऊत म्हणाले...

 उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याला संजय राऊत यांनाच जबाबदार धरले आहे. त्यानंतर...

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याला संजय राऊत यांनाच जबाबदार धरले आहे. त्यानंतर...

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याला संजय राऊत यांनाच जबाबदार धरले आहे. त्यानंतर...

    मुंबई, ३० जून - शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे उद्धव ठाकरे (uddhav thackery) यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की आली. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यामुळेच ही वेळ आल्याची टीका केली. त्यानंतर आज 'जय महाराष्ट्र'म्हणत राऊत यांनी ट्वीट केलं, त्यामुळे संजय राऊत यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली होती. पण, राऊतांनी यावर खुलासा केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. बंडखोर गटाने   उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याला संजय राऊत यांनाच जबाबदार धरले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना खुलासा केला आहे. 'आज शिवसेनेचे मीठ खातोय आणि नंतर पळून जाण्यासारखी आमची औलाद नाही. मी रोज सकाळी जय महाराष्ट्र करतो, मी नेहमीच पक्षासोबत राहणार आहे. मला ईडीने बोलावले आहे. त्यामुळे मी उद्या ईडी ला सामोरा जाणार आहे आणि जी कारवाई होईल त्याला सामोरं जाणार आहे, असंही राऊत म्हणाले. 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. महाराष्ट्रात काय परिस्थिती निर्माण करण्यात आली हे त्यांनी संयमाने सांगितले आणि सर्वोच्च न्यायालय निर्णयानंतर खुर्चीला चिकटून राहण्यात अर्थ नसतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांना मुख्यमंत्री व्हावे असे विनंती केली म्हणून ते मुख्यमंत्री झाले. आज जी तोंडाची पट्टी वाजवत आहेत आणि शरद पवार किंवा माझ्यावर आरोप करत आहेत. त्यांना जे काय कॉन्ट्रॅक्ट मिळाला सरकार पाडण्याचे आणि त्यांनी पाडले, अशी टीकाही राऊत यांनी केली. 'मी पक्षाचे काम करू नये यासाठी असा दबाव आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.दीपक केसरकर आदल्या दिवशी माझ्यासोबत चहा पीत होते. उगाच काही कारणे देऊ नका आणि शिवसेनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न केले आणि मी जबाबदारी घेतो. तुम्ही कोणाला मुख्यमंत्री करणार आहात, तुमचा नेता कोण आहे ? तुम्हाला आता धुणीभांडी करावी लागतील. तुमचा मार्ग वेगळा आहे, आमचा मार्ग वेगळा आहे उगाच पवार आणि मला जबाबदार धरत आहेत. काहीतरी कारणे द्यायची म्हणून देतात, असा टोलाही राऊत यांनी केसरकरांना लगावला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या