मुख्यमंत्रीपदी मीच राहणार आणि प्रदेशाध्यक्षही दानवेच राहणार-मुख्यमंत्री

मुख्यमंत्रीपदी मीच राहणार आणि प्रदेशाध्यक्षही दानवेच राहणार-मुख्यमंत्री

जोपर्यंत मला बोलावले जाणार नाही. तोपर्यंत मी कुठे जाणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कायम असणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

  • Share this:

16 आॅगस्ट :  मी केंद्रात जाणार नाही. केंद्रातून असा कोणताही निरोप आला नाही. जोपर्यंत मला बोलावले जाणार नाही. तोपर्यंत मी कुठे जाणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कायम असणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसंच दानवे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका जिंकल्या आहेत, त्यांना प्रदेशाध्यक्षपदावर हटवलं जाणार नाही अशी भक्कम पाठराखणही मुख्यमंत्र्यांनी केली.

बोरिवलीमध्ये भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आलीये. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार अशा बातम्यांचा मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला. मुळात हा भाजप पक्ष आहे. इथं दिल्लीवरुन निरोप आले म्हणून पद बदलले असं भाजपमध्ये काही होत नाही. मी राज्याचा मुख्यमंत्री कायम राहणार आहे. कुठेही जाणार नाही. तसा केंद्रातून मला कोणताही निरोप आला नाही असं स्पष्ट करत प्रसारमाध्यमांच्या बातम्यांचं मुख्यमंत्र्यांनी खंडन केलं.

तसंच रावसाहेब दानवे यांची उचलबांगडी होणार अशी चर्चा सुरू आहे याचंही मुख्यमंत्र्यांनी खंडन केलं. रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्हा परिषद, नगरपरिषदेच्या निवडणुका जिंकल्यात त्यामुळे दानवे हेच प्रदेशाध्यक्ष राहणार आहे. ते कुठेही जाणार नाही अशी पाठराखण मुख्यमंत्र्यांनी केली.

 

"कसली संघर्षयात्रा"  -मुख्यमंत्री

विरोधकांच्या संघर्ष यात्रेला शेवटची सभा सोडली तर प्रत्येक सभेला एक हजार पण लोकं नव्हती काही ठिकाणी तर गर्दी जमवली गेली. प्रशासनावर दबाव टाकला गेला असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केला.

सुकाणू समिती की जिवाणूची समिती ? या समितीमध्ये अशी काही लोकं आले जे निवडणुकीला उभे राहिले तर त्यांचं अनामत जप्त होईल अशी ही लोक आहेत अशी जळजळीत टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.

हा देशद्रोह नाही का ? -मुख्यमंत्री

सव्वा लाख कोटी च्या कर्जमाफी केली तर राज्य बंद करावं लागेलं, मग या आंदोलनामागे कोण आहे? आंदोलन करणारे 15 ऑगस्ट ला झेंडावंदन करू देणार नाही अशी भूमिका घेतात हा देशद्रोह नाही का ? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थितीत केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2017 05:08 PM IST

ताज्या बातम्या