Home /News /mumbai /

' बाबरी पाडायला गेलो तेव्हा 128 किलो वजन होतं', फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना स्पष्टच सांगितलं

' बाबरी पाडायला गेलो तेव्हा 128 किलो वजन होतं', फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना स्पष्टच सांगितलं

 मी तुम्हाला सांगतो. कशाला लपवायचं? आज माझं वजन 102  किलो आहे. जेव्हा बाबरी पाडायला गेलो तेव्हा 128  होतो'

मी तुम्हाला सांगतो. कशाला लपवायचं? आज माझं वजन 102 किलो आहे. जेव्हा बाबरी पाडायला गेलो तेव्हा 128 होतो'

मी तुम्हाला सांगतो. कशाला लपवायचं? आज माझं वजन 102 किलो आहे. जेव्हा बाबरी पाडायला गेलो तेव्हा 128 होतो'

    मुंबई, 15 मे - 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले? देवेंद्र फडणीस यांनी पाय ठेवला असता तरी ढाचा खाली आला असता. माझ्यावर एवढा विश्वास आहे? मी तुम्हाला सांगतो. कशाला लपवायचं? आज माझं वजन 102  किलो आहे. जेव्हा बाबरी पाडायला गेलो तेव्हा 128  होतो'असं सांगत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis speech) यांनी स्पष्टपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुनावले. भारतीय जनता पार्टी मुंबईच्यावतीने हिंदी भाषिक संकल्प संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या संमेलनात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टिकेला जोरदार उत्तर दिले. 'उद्धव ठाकरे काय म्हणाले? देवेंद्र फडणीस यांनी पाय ठेवला असता तरी ढाचा खाली आला असता. माझ्यावर एवढा विश्वास आहे? मी तुम्हाला सांगतो. कशाला लपवायचं? आज माझं वजन १०२ किलो आहे. जेव्हा बाबरी पाडायला गेलो तेव्हा १२८ होतो. उद्धवजींना ही भाषा नाही समजणार. उद्धवजी तुम्हाला वाटतंय, माझ्या पाठीवर खंजीर खुपसून तुम्ही माझं राजकीय वजन कमी करु शकाल. लक्षात ठेवा हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली पाडल्याशिवाय थांबणार नाही. बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे. उद्धवजी त्याच मैद्याच्या पोत्यावर नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झालात. वजनदार लोकांपासून सांभाळून राहा. जितकं वरती वाटतं त्यापेक्षा दप्पट खाली आहे'' असा सणसणीत टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. (watermelon rate : कलिंगडाचे दर गडगडले; ग्राहकांची रांग, शेतकरी मात्र बेहाल!) 'काल कुणीतरी वाघ म्हणून ट्विट केलं. त्यांना समजवून सांगा, वाघाचा फोटो काढला म्हणून वाघ होता येत नाही. वाघ असेल तर निधड्या छातीने आव्हानांचा सामना करावा लागतो. तेव्हा वाघ होता येतं. नुसती फोटोग्राफी करुन वाघ होता येत नाही. तुम्ही कुठला सामना केला? कुठल्या संघर्षाला तुम्ही होता? कुठल्याच संघर्षाला नाही. आजही दोन वर्ष कोरोनाचा संघर्ष चालला. उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह होते. आम्ही अलाईव्ह होतो, असा टोलाही फडणवीसांनी लगावला. ('ओठांचं चुंबन, प्रेमाने स्पर्श हा अनैसर्गिक गुन्हा नाही,' कोर्टाचं मोठं विधान) 'तुम्ही सहलीला गेले होते. आम्ही सहलीला गेलो नव्हतो. तेव्हा तर सोडा, ज्यावेळी कारसेवा झाली तेव्हाही देवेंद्र फडणवीस गेला होता. अनेकदिवस पदायूच्या जेलमध्ये होता. आजही जेलची आठवण आहे तिथे मी वाट पाहत होतो की, आम्ही पोहोचलो, कुणीतरी शिवसेनेवाला येईल. कुणीच आलं नाही. त्याआधी काश्मीरमध्ये हिंदूंवर अत्याचार झालं. मी विद्यार्थी परिषदेबरोबर आतंकवाद्यांचा मुकाबला करता, मनोबल वाढवण्याकरता देवेंद्र फडणवीस गेला होता. आम्ही फाईव्ह स्टारचं राजकार नाही तर जमीनीवरचं राजकारण केलं आहे. जेव्हा गेलो तेव्हा तिकीट काढलं नाही. प्लॅटफॉर्म, फुटपाथ, मंदिरामध्ये झोपलो. गोळ्या झेल्या, लाठ्या मारताना पाहिल्या, लाठ्याही खाल्या म्हणून इथपर्यंत पोहोचलो. सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालेलो नाही. जेव्हा त्या अयोध्येत बाबरी ढाचा पडत होता तेव्हा शेपट्या कोणी आणि कुठे टाकल्या होत्या? आम्हाला एका सांगा. कारसेवकांची थट्टा करणाऱ्यांना सांगू इच्छितो, जेव्हा देशाला आवश्यकता असेल तेव्हा आम्ही कारसेवक म्हणून जाणार', असंही फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या