माझा सहकाऱ्यांवर विश्वास, त्यांच्या फोन टॅपिंगची मला गरज नाही – उद्धव ठाकरे

माझा सहकाऱ्यांवर विश्वास, त्यांच्या फोन टॅपिंगची मला गरज नाही – उद्धव ठाकरे

'लोक माझ्यावर टीका करतात की मी घराबाहेर पडत नाही म्हणून, मात्र माझ्या सहकाऱ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे.'

  • Share this:

मुंबई 03 डिसेंबर: राज्यातल्या महाविकास आघाडीला (Maharashtra Government) एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज ‘महाराष्ट्र थांबला नाही. महाराष्ट्र थांबणार नाही’ या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी केलेल्या छोटेखानी भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. माझा सहकाऱ्यांवर विश्वास असून त्यांचे फोन टॅपिंग करण्याची मला गरज नाही असा जोरदार टोला त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले, लोक माझ्यावर टीका करतात की मी घराबाहेर पडत नाही म्हणून, मात्र माझ्या सहकाऱ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. सहकारी म्हणायचं आणि त्यांचे फोन टॅपिंग करायचे याची मला गरज नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

मंत्रिमंडळात काम करताना उद्धव ठाकरे हे सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढे जातात असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं. ठाकरे पुढे म्हणाले, मैदानातून येऊन टोलेबाजी करण्याचा वेगळा अनुभव आहे.  गेल्या वर्षभरामध्ये आमचं टीमवर्क झाले ते पाहता हे सर्व माझे सहकारी आहे. शासनातले आहे, प्रशासनातले आहे.  शरद पवार यांचे आशीर्वाद आमच्यावर आहे. अजूनही विश्वास बसत नाही. एक वर्ष पूर्ण झाले आहे. प्रत्यक्ष क्रिकेट पाहणे आणि मैदानात उतरून टोलेबाजी करणे हे वेगळं असतं. त्यासाठी टीम ही मजबूत असायला लागते. माझी टीम ही उत्तम आहे. सर्व जण अनुभवी आहे. सर्व जण छान काम करत आहे' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सर्व सहकार्यांचं कौतुक केलं.

अनेक जणांना असं वाटत होते. हे सरकार होऊच शकणार नाही. आपल्या मागे फरफटत येणारच. पण शिवसेना कधी फरफटत जाणाऱ्या पक्षासारखी नव्हती, आधी नव्हती आणि आताही नसणार आहे' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

संकटांच्या मालिकांना तोंड देणारं सरकार संबोधून पवारांकडून मुख्यमंत्र्यांच कौतुक

शरद पवार, सोनिया गांधी या सर्वांचे आशिर्वाद आहे. शरद पवार हे कधीच एका जागी थांबत नाही. बहुतेक लॉकडाउन लागला तेव्हा ते कदाचित घरी थांबले असतील. कार्यक्रम झाल्यावर वर्षा बंगल्यावर येण्याचे सांगितले तर ते पुण्याला चालले आहे.  शरद पवार यांच्या आयुष्यावर एखादे पुस्तक तयार करायला हवे, जे येणाऱ्या नवोदित राजकारण्यांना मार्गदर्शक ठरेल' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर स्तुतीसुमनं उधळली.

'सोनिया गांधी यांच्याशी एकदाच भेट झाली. बऱ्याच वेळा त्यांच्याशी फोनवर बोलणे होत असते. त्या नेहमी विचारता सरकारचे चांगले काम सुरू आहे, आमची लोकं त्रास तर देत नाही ना, असं विचारत असता, ते खरंच विचारत असता. कारण, मी तुमची बाजू लावून धरत असतो. राष्ट्रवादीपेक्षा जास्त तुम्ही सहकार्य करता' असं म्हणता सभागृहात एकच हश्शा पिकली.

'या सरकारमध्ये कुठे उगाच अडेलतटूपणा नाही, सर्वांची मानमर्यादा धरून काम पाहिले जात आहे. विषय उगाच लावून धरले जात नाही. 3 चाकी सरकार म्हणतात. पण चौथ चाकं म्हणजे लोकांचा विश्वास आहे, आमचे पाय जमिनीवर घट्ट आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी  फडणवीस यांना टोला लगावला.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 3, 2020, 6:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading