Eknath shinde : 'पाच वेळा प्रयत्न केला होता', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
Eknath shinde : 'पाच वेळा प्रयत्न केला होता', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यास सांगितलं. त्यावेळी मी उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभा होतो. आम्ही सत्तेच्या किंवा पदासाठी लालची नव्हतो.
शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यास सांगितलं. त्यावेळी मी उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभा होतो. आम्ही सत्तेच्या किंवा पदासाठी लालची नव्हतो.
मुंबई, 04 जुलै : 'महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. पुढे निवडणूक झाली तर कसं करायचं. शिवसेना आणि भाजप युती म्हणून आपण लढलो होतो. आता काँग्रेससोबत आहे. निवडणूक कशी लढायची. मी पाच वेळा हा प्रयत्न केला होता. पण आम्हाला अपयश आले. केसरकर हे साक्षीदार आहे' असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm ekanth shinde speech) यांनी केला.
शिंदे आणि फडणवीस सरकारने बहुमत चाचणी जिंकली. त्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर झालेले आरोप आणि टिकेला सडेतोड उत्तर दिले. यावेळी शिंदे यांनी मनसोक्तपणे भाषण केलं, सभागृहाने शिंदे यांचं भाषण अक्षरश: डोक्यावर घेतलं.
शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यास सांगितलं. त्यावेळी मी उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभा होतो. आम्ही सत्तेच्या किंवा पदासाठी लालची नव्हतो. त्यावेळी हे सगळं सुरू होतं, आमदार जे निवडून आले होते, आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. पुढे निवडणूक झाली तर कसं करायचं. शिवसेना आणि भाजप युती म्हणून आपण लढलो होतो. आता काँग्रेससोबत आहे. निवडणूक कशी लढायची. मी पाच वेळा हा प्रयत्न केला होता. पण आम्हाला अपयश आले. केसरकर हे साक्षीदार आहे. त्यानंतर अडीच वर्षांमध्ये वेगवेगळे अनुभव आहे म्हणून हे पाऊल उचलले, असं शिंदेंनी सांगितलं.
आम्हाला गद्दार म्हटलं जात आहे, भास्कर जाधव आम्ही गद्दार नाही. जो काही निर्णय घेतला आहे, वैयक्तिगत मला काही स्वार्थ नव्हता. सुरुवातील मला मुख्यमंत्री करणार ही वस्तुस्थितीत होती. पण अजितदादा की कुणी तरी सांगितलं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको म्हणून सांगितलं. त्यानंतर मला सांगितलं तुम्हीच मुख्यमंत्री होणार आहे. सुधीर जोशी आणि मनोहर जोशी यांचा किस्सा सुरू होता, त्यावेळी मी अजितदादांना विचारला, त्यावेळी त्यांनी पक्षातूनच विरोध होता असं सांगितलं गेलं. त्यानंतर मी विसरलो,असंही शिंदे म्हणाले.
' फडणवीस यांनी त्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. मी बाजूला बसलेले होतो. फडणवीस आणि मला सगळं माहिती होतं. त्यांनी सांगितलं एकच शपथविधी होणार होता. फडणवीस यांना सगळं काही माहिती होतं. त्यांचे 115 आणि आमचे 50 असे 165 झाले होते. जे शिवसेनेतून गेले होते. त्यावेळी शिवसेनेतून जी लोकं गेली होती ती दुसऱ्या पक्षात गेली होती, त्यामुळे ती पडली होती. आता आम्ही 200 माणसं निवडून आणून दाखवू हे सभागृहामध्ये आश्वासन देतो.आमच्याकडे असलेली 50 माणसं अजिबात पडू देणार नाही. जर निवडून आली नाहीतर...असं म्हणत शिंदे यांनी हात वर केले, त्यामुळे सभागृहात एकच हश्शा पिकली आणि लगेच, 'शेती करायला गावाला निघून जाईन' असं शिंदेंनी वाक्य पूर्ण केलं आणि पुन्हा सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.
'विधान परिषद निवडणूक संपल्यानंतर आम्ही मुंबईतून निघालो होतो. राज्याच्या सीमेच्या बाहेर होतो, त्यावेळी टॉवर लोकशन होते, आयजीला सांगून नाकाबंदी केली. मीही बरीच वर्ष काम केली. मलाही माहिती आहे, नाकाबंदीमधून कसं निघायचं आहे ते. त्यावेळी अजितदादांनी विचारलं सगळं काही सांगा...,तुम्ही आता माझ्याकडून सगळं काही काढून घेऊ नका, खासगीमध्ये सांगतो सगळं, मी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही निघून जायचे, असं म्हणताच पुन्हा सभागृहात एकच हश्शा पिकली.
'राज्यसभेला आम्ही पूर्ण फिल्डिंग लावली होती. 42 आमदार घेऊ असं काँग्रेसने ठरवली होती आणि राष्ट्रवादीने एक मत घेतलं, 43 मतं झाली. पण साला आमचा एक माणूस पडला. आम्ही मत मोजली तर काही कळायला मार्ग नाही. पडला तो वेगळा पडला होता, पण दुसरा माणूस पडायला हवा होता. पण मी म्हणालो, दोन्ही खासदार निवडून येण्याचे ठरले होते तसं गणित होतं. आमचे दोन्ही निवडून आले पाहिजे पण गडबड झाली. विधान परिषदेची निवडणुकीतून मला बाहेर काढलं होतं. संजय पवार यांना 3 मत जास्त आणली होती, असा खुलासाही शिंदेंनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.