'समृद्धी'च्या व्यवहारासाठी मीच शिंदेंना तिथे पाठवलं होतं -उद्धव ठाकरे

'समृद्धी'च्या व्यवहारासाठी मीच शिंदेंना तिथे पाठवलं होतं -उद्धव ठाकरे

मृद्धी महामार्गाला आमचा विरोध नाही पण तिथे शेतकऱ्यांसोबत जोरजबरदस्ती होणार असेल तर तसं आम्ही होऊ देणार नाही असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

  • Share this:

15 जुलै : समृद्धी महामार्गाला आमचा विरोध नाही पण तिथे शेतकऱ्यांसोबत जोरजबरदस्ती होणार असेल तर तसं आम्ही होऊ देणार नाही असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तसंच एकनाथ शिंदे यांना हिंगणे गावात बोलण्यासाठी मीच पाठवलं होतं अशी बाजूही उद्धव ठाकरेंनी मांडली.

एकीकडे समृद्धी महामार्गाला उद्धव ठाकरे विरोध करत आहे आणि दुसरीकडे सेनेचे मंत्री एकनाथ शिंदे स्वत: जाऊन  समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचा व्यवहार करत असल्याचं समोर आलंय. त्यामुळेच आज उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली.

माझी भूमिका स्पष्टं आणि ठाम आहे. जो पर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या जो पर्यंत मान्य होत नाही. तो पर्यंत शिवसेना त्यांच्या सोबत आहे. शेतकऱ्यांची सुपीक जमीन समृद्धी महामार्गासाठी वापरली जाता काम नये. आणि त्यांच्या जमिनीचा मोबदला योग्य मिळावा या शेतकऱ्यांच्या भूमिका आहे. यासाठीच मी एकनाथ शिंदे यांना तिथे पाठवलं होतं. त्यांच्या उपस्थिती शेतकऱ्यांनी जमिनी व्यवहार पूर्ण केला असा खुलासा उद्धव ठाकरेंनी केला. तसंच  समृद्धी हायवेच्या जमिनीचे अधिग्रहण जोर-जबरदस्तीने होणार नाही जर असं होत असेल तर त्याला आमचा विरोध कायम राहिल असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसंच रामनाथ कोविद यांनी स्वत: फोन केला होता आणि सेनेनं पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

पक्षापेक्षा मंत्रिपद मोठे नाही -एकनाथ शिंदे

तर, उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतरच मी तिथे गेलो होतो. प्रकल्प होत असताना शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये. 'हिंगणे येथील शेतकरी स्व:ताहून आले होते. त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून मी व्यवहारासाठी हजर होते.  जमीन अधिग्रहणाचे काम हे उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसारच सुरू आहे. मला पक्षापेक्षा मंत्रिपद मोठे नाही असंही शिंदे म्हणाले. आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये हीच आमची भूमिका आहे असंही शिंदे म्हणाले.

First published: July 15, 2017, 5:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading