Home /News /mumbai /

पंतप्रधानांच्या बैठकीत बोलण्याची संधीच मिळाली नाही, राजेश टोपेंचा मोठा खुलासा

पंतप्रधानांच्या बैठकीत बोलण्याची संधीच मिळाली नाही, राजेश टोपेंचा मोठा खुलासा


'पोस्ट ऑपरेटिव्ह ट्रीटमेंमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनुपस्थित होते. सलग 2/3 तास त्यांना एका जागी बसणं शक्य नव्हतं.

'पोस्ट ऑपरेटिव्ह ट्रीटमेंमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनुपस्थित होते. सलग 2/3 तास त्यांना एका जागी बसणं शक्य नव्हतं.

'पोस्ट ऑपरेटिव्ह ट्रीटमेंमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनुपस्थित होते. सलग 2/3 तास त्यांना एका जागी बसणं शक्य नव्हतं.

मुंबई, 13 जानेवारी : देशभरात कोरोनाबाधित (corona) रुग्णांपैकी महाराष्ट्रात (maharashtra corona cases) सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. प्रकृतीच्या कारणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला गैरहजर होते. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope ) यांनी 'या बैठकीमध्ये बोलण्याची संधीच मिळाली नाही, त्यामुळे लेखी स्वरूपात कळवावे लागले' अशी माहिती दिली आहे. कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतातूर वातावरण आहे. अनेक राज्यात निर्बंध लावण्यात आले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तब्येतीच्या कारणामुळे हजर नव्हते. त्यांच्याऐवजी आरोग्य मंत्री राजेश टोपे बैठकीला हजर होते, पण त्यांना बोलण्याची संधीच मिळाली नाही. 'पोस्ट ऑपरेटिव्ह ट्रीटमेंमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनुपस्थित होते. सलग 2/3 तास त्यांना एका जागी बसणं शक्य नव्हतं. त्यामुळे लेखी पत्र देऊन मी महाराष्ट्राची बाजू मांडली. पंतप्रधानांनी 8 मुख्यमंत्र्यांना बोलू दिलं पण मला प्रत्यक्ष बोलून बाजू मांडायची संधी मिळाली नाही म्हणून आम्ही लेखी सादर केलं, अशी माहिती टोपे यांनी दिली. (नवी मुंबई सीजीएसटी आयुक्तालयाकडून 10 कोटींचा इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा उघड) ट्रिटमेंट पद्धतीसाठी केंद्रानं मार्गदर्शन करावं, कोविड खर्च काही बाबतीत तफावत आहे. लिक्विड मेडिकल ऑक्सिजन 20 लाख तर मेडिकल पाईपलाईन 15 लाख आहे. जे एम पोर्टलवर या किमती दुप्पट दिसत आहे. याबाबत सुधारित दर केंद्रानं द्यावे आणि उपाययोजनेची SOP द्यावी, अशी मागणी टोपेंनी केली. (Omicron संदर्भात जीनोम सिक्वेन्सिंगची रणनिती बदलणार!) 'मुख्यमंत्र्यांना तब्येत अडचणी असतील म्हणून ते अनुपस्थित होते. ते काळजी घेत आहेत, पण काम करत आहेत. अनेक बैठकींना ते उपस्थित होते. त्याबद्दल कोणी टिप्पणी करू नये' असं म्हणत राजेश टोपे यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Rajesh tope, राजेश टोपे

पुढील बातम्या