मुंबईतल्या सगळ्याच ठिकाणी लक्ष ठेवणं अशक्य -महापौर

मुंबईतल्या सगळ्याच ठिकाणी लक्ष ठेवणं अशक्य -महापौर

तसंच या सगळ्याची माहिती मी ठेवायला लागलो तर वॉर्ड ऑफिसर कशासाठी आहेत असंही विधानही त्यांनी केलंय.

  • Share this:

मुंबई, 29 डिसेंबर: मुंबईतल्या प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवणं अशक्य आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलंय मुंबईचे महापौर महाडेश्वर यांनी. तसंच या सगळ्याची माहिती मी ठेवायला लागलो तर वॉर्ड ऑफिसर कशासाठी आहेत असंही विधानही त्यांनी केलंय.

कमला मिलमध्ये आग लागल्यानंतर तब्बल 12 तासांनी महापौर घटनास्थळी पोचले आहेत. त्यांनी पाहणी केल्यानंतर याप्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करू अशी माहिती दिली आहे.

लोअर परेल भागातल्या कमला मिल कंपाऊंडमधल्या हॉटेल मोजोसला आग लागली होती. ही आग एवढी भीषण होती की, मोजोसच्या बाजूलाच असलेलं लंडन टॅक्सी हे रेस्टॉरंटही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. या आगीत गुदमरून 15 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर 21 जण जखमी झाले आहेत.

येथील हॉटेल मोजोसच्या टेरेसवर प्लॅस्टिक आणि बांबूचे बांधकाम होते. त्या बांबूंना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. कमला मिल कंपाऊंडमध्ये टीव्ही9 मराठी, टाइम्स नाऊ, मुंबई मिरर सारखी मीडिया हाऊस आहेत. अचानक लागलेल्या या आगीमुळे विविध कार्यालयातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं होतं . 29 डिसेंबर: मुंबईतल्या प्रत्येक घटनेची मला माहिती असेलच असं नाही असं वादग्रस्त वक्तव्य केलंय मुंबईचे महापौर सुनील महाडेश्वर यांनी. तसंच या सगळ्याची माहिती मी ठेवायला लागलो तर वार्ड ऑफिसर कशासाठी आहेत असंही विधानही त्यांनी केलंय.

कमला मिलमध्ये आग लागल्यानंतर तब्बल 12 तासांनी महापौर घटनास्थळी पोचले आहेत. त्यांनी पाहणी केल्यानंतर याप्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करू अशी माहिती दिली आहे.

लोअर परेल भागातल्या कमला मिल कंपाऊंडमधल्या हॉटेल मोजोसला आग लागली होती. ही आग एवढी भीषण होती की, मोजोसच्या बाजूलाच असलेलं लंडन टॅक्सी हे रेस्टॉरंटही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. या आगीत गुदमरून 15 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर 21 जण जखमी झाले आहेत.

येथील हॉटेल मोजोसच्या टेरेसवर प्लॅस्टिक आणि बांबूचे बांधकाम होते. त्या बांबूंना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. कमला मिल कंपाऊंडमध्ये टीव्ही9 मराठी, टाइम्स नाऊ, मुंबई मिरर सारखी मीडिया हाऊस आहेत. अचानक लागलेल्या या आगीमुळे विविध कार्यालयातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं होतं .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2017 06:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading