Home /News /mumbai /

'मी पुन्हा आलो आणि आता बदला घेणार, पण...', देवेंद्र फडणवीसांची सभागृहात टोलेबाजी

'मी पुन्हा आलो आणि आता बदला घेणार, पण...', देवेंद्र फडणवीसांची सभागृहात टोलेबाजी


'मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं, त्यावर माझी खूप टिंगळ टवाळी केली. पण मी आता आलो आहे

'मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं, त्यावर माझी खूप टिंगळ टवाळी केली. पण मी आता आलो आहे

'मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं, त्यावर माझी खूप टिंगळ टवाळी केली. पण मी आता आलो आहे

    मुंबई, 04 जुलै : शिंदे सरकारने अखेर बहुमत चाचणी पास केली आहे. 164 आमदारांची मत मिळवत शिंदे सरकारवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. 'मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं, त्यावर माझी खूप टिंगळ टवाळी केली. पण मी आता आलो आहे आणि एकटा नाही आलो तर सगळ्यांना घेऊन आलो आहे' असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोरदार टोलेबाजी केली. शिंदे सरकारने बहुमत जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी शिंदेंचं कौतुक केलं. 'एकनाथ शिंदे यांचे सरकार आता आले आहे. शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास थक्क करणार आहे. एकनाथ शिंदे हे रसायन वेगळे आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. 'मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं, त्यावर माझी खूप टिंगळ टवाळी केली. पण मी आता आलो आहे आणि एकटा नाही आलो तर सगळ्यांना घेऊन आलो आहे. मी सगळ्यांचा आता बदला घेणार आणि बदला आहे की मी त्यांना माफ केले आहे. राजकारणामध्ये अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसता. प्रत्येकाचा मौका येत  येत असतो.  'दुनिया में सारे शोक पाले नही जाते, काच के खिलोने हवा में उछाले नही, जाते सारे काम तक्कदीर भरसे टाले नही जाते' अशी शायरी म्हणत फडणवीसांनी टोला लगावला. आम्ही विरोधी बाकावर होतो पण कधी विचलित झालो नाही. कोरोनाच्या काळातही जनतेमध्ये राहिलो. काही लोक हे आम्हाला म्हणतात की सत्तेसाठी आम्ही आहोत. पण, सामाजिक काम करण्यासाठी सत्ता हवी आहे. पर्यायी सरकार देणार असं म्हटलो होतो. आता नरेंद्र मोदी यांनी ते दाखवून दिले आहे. ज्या पक्षाने मला सर्वोच्च अधिकार दिले, आज त्यांनी मला उपमुख्यमंत्रिपदावर बसण्याचे आदेश दिले मी ते स्विकारलं. आज मी शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असंही फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं. आमच्या  सरकारमध्ये कुरघोडी, शह देण्याचे दिसणार नाही. आमची मैत्री कधीच मोडणार नाही. मी कुणाला उपमा देणार नाही. पण, एवढंच सांगतो जेव्हा धनानंदाची सत्ता जाते त्यावेळी चंद्रगुप्त शोधावा लागतो आणि ही सत्ता खाली आणावी लागते, हे आता झाले आहे, असंही फडणवीस म्हणाले. शरद पवार यांनी सुद्धा संघ, संघाची शिस्त याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. मी संघ सेवक आहेच. मी त्यांचे आभार मानतो. राज ठाकरे यांनी सुंदर पत्र लिहिले, मी त्यांना दुसऱ्या दिवशी उत्तर देणार होतो, पण फोन करून आभार मानले. आता आपण सगळे राजकीय विरोधक आहोत. सगळे मित्र आहे. हे सगळे ईडीमुळेच आले आहे. पण ही ईडी म्हणजे, एकनाथ आणि देवेंद्र आहे, असंही फडणवीस म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या