मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'मी जबाबदारीतून पळणारा नाही', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

'मी जबाबदारीतून पळणारा नाही', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

'मार्मिक आणि माझे वय सारखेच आहे. आता या वयात मार्मिक ही बदलतोय. तशीच माझी ही बदललेली जबाबदारी...'

'मार्मिक आणि माझे वय सारखेच आहे. आता या वयात मार्मिक ही बदलतोय. तशीच माझी ही बदललेली जबाबदारी...'

'मार्मिक आणि माझे वय सारखेच आहे. आता या वयात मार्मिक ही बदलतोय. तशीच माझी ही बदललेली जबाबदारी...'

मुंबई, 13 ऑगस्ट : नवी दिल्लीत भेटीगाठी आणि जोर बैठकामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. तर दुसरीकडे,  'माझी ही बदललेली जबाबदारी तुम्ही पाहत आहात. ही जबाबदारी तुमच्यामुळे माझ्याकडे आली आहे आणि मी या जबाबदारीतून पळणारा नाहीये' असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm Uddhav Thackeray) यांनी ठणकावून सांगितलं. आज मार्मिक वर्धापन दिन सोहळा (shivsena magazine marmik turn 60) मुंबईत पार पडत आहे.  राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शिवसैनिकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुंचल्यातून साकारलेले "मार्मिक" व्यंगचित्र साप्ताहिक आज ६१ वर्ष पुर्ण करतंय.  शिवसेना पक्षाच्या प्रवासात "मार्मिक" व्यंगचित्र साप्ताहिक शिवसेनेच्या स्थापनेचा पाया होता. आज "मार्मिक" चा होत असलेल्या 61 व्या वर्धापन दिनाला शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी यावेळी संवाद साधला. अभिनेत्रीचा Private MMS video झाला लीक; सोशल मीडियावर व्यक्त केला संताप 'मार्मिक आणि माझे वय सारखेच आहे. आता या वयात मार्मिक ही बदलतोय. तशीच माझी ही बदललेली जबाबदारी तुम्ही पहाताय. ही जबाबदारी तुमच्यामुळे माझ्याकडे आलीय आणि मी जबाबदारीतून पळणारा नाहीये' असं यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. संकटाच्या छाताडावर चालून जा. ते खरे शौर्य आहे. आता 'रडायचं नाही लढायचंय. ही प्रेरणा आपल्याला मार्मिकने दिली.' असंही मुख्यमंत्री म्हणाले.

नागपंचमीसाठी प्रसिद्ध बत्तीस शिराळ्यात कोरोना निर्बंधांमुळे अशी निघाली मिरवणूक

दरम्यान, त्याआधी या कार्यक्रमाला भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते  प्रवीण दरेकर यांनी हजेरी लावली. यावेळी दरेकर यांच्या मार्फत पूरग्रस्त भागांसाठी दीड कोटींची मदत देण्यात आली आहे. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. सुमारे 15 ते 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती, न्यूज १८ लोकमतला विश्वसनीय सूत्रांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली याची राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
First published:

पुढील बातम्या