मुंबई, 05 ऑक्टोबर: एका बांधकाम व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या दोन माजी कर्मचाऱ्यांनी कंपनीला तब्बल 300 कोटींची चुना लावला. याप्रकरणी निहारिका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे. दोघा माजी कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या मालकीचा हैदराबादमधील एक महलच परस्पर विकून टाकला आहे.
निहारिका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी हैदराबाद येथील नजरी बाग पॅलेस हा महल 3 वर्षांपूर्वी नजरी बाग पॅलेस ट्रस्टकडून विकत घेतला होता. हा पॅलेस 100 वर्षा पूर्वीचा आहे. हैदराबादच्या हैदरगुडा परिसरात असलेला हा महल किंग कोठी या नावाने प्रसिद्ध आहे. या वर्षी जूनमध्ये कंपनीचे कर्मचारी जेव्हा हैदराबादच्या मालमत्ता नोंदणी कार्यालायत गेले तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण जो महल कंपनीने 3 वर्षापूर्वी विकत घेतला होता त्याची मालकी आता आयरिस हॉस्पिटॅलिटीकडे गेली होती. संदर्भात चौकशी केली असता आयरिसने सुरेश कुमार आणि सी.रविंद्र यांच्याशी व्यवहार केल्याचे समोर आले. हे दोघेही निहारिकाचे माजी कर्मचारी आहेत. दोघांनी फ्रेब्रुवारी महिन्यात राजीनामा दिला होता.
सुरेश कुमार आणि सी.रविंद्र यांनी कंपनीला कोणतीही माहिती न देता परस्पर काश्मीर येथील आयरिस हॉस्पिटॅलिटीचे मालक अमित अमला आणि अर्जुन अमला यांना 300 कोटींची मालमता विकली. निहारिका इन्फ्रास्ट्रक्चरचे नवी मुंबई आणि मुंबईत अनेक प्रकल्प सुरुआहेत. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरेश आणि रविंद्र यांनी मालमत्ता विकताना बनावट कागदपत्रे दाखवली. या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यवहारात हैदराबादच्या एका व्यक्तीने त्यांना मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे.
हैदराबादच्या निजामाचा पॅलेस
किंग कोठी पॅलेस ही मालमत्ता 2.5 लाख एकर इतकी मोठ्या जागावर पसरलेली मालमत्ता आहे. हैदराबाद संस्थान भारतात विलिन होण्याआधी अखेरचे निजाम याच ठिकाणी राहत होते. 1967मध्ये निजामाचा मृत्यू झाला. त्यांनी ही संपत्ती कमाल खान यांच्याकडून विकत घेतली होती. निजामानेच याचे नाव नजरी बागवरून किंग कोठी असे ठेवले होते.
आरेत रात्री केलेल्या झाडांच्या कत्तलीवर उद्धव ठाकरे काय म्हणाले? पाहा VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा