Youtube वर रात्री व्हिडिओ पाहते म्हणून पतीने नायलॉन दोरीने आवळला पत्नीचा गळा

Youtube वर रात्री व्हिडिओ पाहते म्हणून पतीने नायलॉन दोरीने आवळला पत्नीचा गळा

युट्यूबवर पत्नी सतत व्हिडीओ पाहते म्हणून पतीने चक्क नायलॉन दोरीने तिचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरी एमआयडीसी परिसरात ही घडली.

  • Share this:

मुंबई, 12 एप्रिल- युट्यूबवर पत्नी सतत व्हिडिओ पाहते म्हणून पतीने चक्क नायलॉन दोरीने तिचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरी एमआयडीसी परिसरात ही घडली.

आरती चौगूले असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. चेतन चौगूले असे आरोपी पतीचे नाव असून तो स्वत: पोलिसांना शरण गेला. याप्रकरणी पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

म्हणून दररोज व्हायचे पती-पत्नीमध्ये भांडण..

चेतन चौगूले आई-वडील, पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलासह अंधेरी एमआयडीसी परिसरातील कामगार वसाहतीमध्ये राहत होता. तो काहीच कामधंदा करत नसल्याने पती-पत्नीमध्ये दररोज भांडण होत होते. आरती युट्यूबवर सतत व्हिडीओ पाहते, हेदीखील चेतनला खटकत होते.

पहाटे चारच्या सुमारास युट्यूबवर पाहात होती व्हिडीओ

चेतनने आरतीकडे पैसे मागितले होते. तिने पैसे देण्यास नकार दिला. नंतर दोघांमध्ये भांडण झाले. रात्री चेतन झोपी गेला. पहाटे चारच्या सुमारास चेतनला जाग आली. त्यावेळी आरती युट्यूबवर व्हिडिओ पाहात होती. त्याचा राग आल्याने चेतनने नायलॉनची दोरीने तिचा गळा आवळून खून केला.

VIDEO: विद्यार्थिनीचा विनयभंग; मनसे कार्यकर्त्यांनी नराधम शिपायाला दिला चोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 12, 2019 03:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading