पती घेत होता चारित्र्यावर संशय.. पत्नीचे हात-पाय बांधून चिरला गळा

पती घेत होता चारित्र्यावर संशय.. पत्नीचे हात-पाय बांधून चिरला गळा

पत्नीचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध आहे, असा संशय विक्रम कुमारला होता.

  • Share this:

कल्याण, 3 सप्टेंबर: चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची गळा चिरुन निर्घृण हत्या केल्याची घटना कल्याणमधील उंबर्डे परिसरात घडली आहे. मृत महिलेचे नाव रेखा असून मारेकरी पती विक्रम कुमार फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पत्नीचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध आहे, असा संशय विक्रम कुमारला होता.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी विक्रम कुमार आणि रेखा हे दाम्पत्य उंबर्डे परिसरातील वसंत चाळीत राहत होते. या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते. विक्रम घरी नसताना एक तरुण त्याच्या पत्नीला भेटायला घरी येत होता. ही बाब विक्रमला समजली. त्यानंतर विक्रम सारखा रेखाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तो तिला कायम नको नको ते ऐकवत होता.

पत्नीचे हात-पाय बांधून चिरला गळा..

ही घटना 30 ऑगस्ट रोजी घडली. विक्रमने गावी जाण्यासाठी रेल्वेची तिकिटे बुक केली होती. पण, रेखा गावी जायला तयार नव्हती. यावरुन दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्याने विक्रमने पत्नीचे हात-पाय बांधले. नंतर चाकूने तिचा गळा चिरुन तिची हत्या केली. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस फरार झालेल्या विक्रमचा शोध घेत आहेत.

आईच्या प्रियकराने केला अल्पवयीन मुलीचा खून

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे चारित्र्याच्या संशयावरून एका 15 वर्षीय मुलीचा खून करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीचा खून करण्याआधी तिला झाडाला बांधून तिचे पाय मोडले, नंतर तिच्या डोक्यावर दांडुक्याने वार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी एकावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गणेश खरात असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलीची आई गेल्या 12 वर्षांपासून पतीपासून विभक्त राहते. ती आपल्या मुलीसह आरोपी गणेश खरातसोबत निमसाखर येथे राहत होती. दरम्यान, मुलगी एका मुलाशी बोलत होती. याच कारणावरून संतापलेल्या गणेश खरात याने काल (सोमवारी) रात्री दोन्ही मायलेकींना आपल्या दुचाकी वाहनावर बसवून जवळच्या निर्जनस्थळी वनक्षेत्रात नेले. मुलीचे पाय आणि कपाळावर दांडुक्याने जबर मारहाण केली. दरम्यान मुलीला सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या आईलाही बेदम मारहाण केली. गंभीर मारहाणीनंतर जखमी मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आरोपीसोबत मुलीच्या आईचे प्रेमसंबंध...

आरोपी गणेश खरात आणि मृत मुलीच्या आईचे प्रेमसंबंध आहे. त्यामुळे पतीपासून विभक्त झाल्यानंतर दोन्ही मायलेकी आरोपीच्या घरी राहत होत्या.आरोपीचा मुलीच्या चारित्र्यावरून संशय घेत होता. एक मुलाशी बोलत असल्याच्या क्षुल्लक कारणावरून गणेश खरात याने हे कृत्य केले. याप्रकरणी वालचंदनगर पोलिस ठाण्यात मृत मुलीच्या आईचा प्रियकर समीर उर्फ गणेश हनुमंत खरात (रा. निमसाखर, ता.इंदापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

VIDEO : बाबा रामदेव यांच्या मेळाव्यात दुकानदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

Published by: Sandip Parolekar
First published: September 3, 2019, 8:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading