चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

दोन तीन भाडे मारल्यानंतर परत घरी आल्यावर त्याला घरात कोणीतरी आल्याचा संशय आला यावरून दोघात जोरदार भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की त्याने हत्याच केली.

  • Share this:

विजय देसाई, विरार 8 सप्टेंबर : विरार भोईरपाडा येथे  एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची गळा कापून हत्त्या करून पोलिस स्टेशनमध्ये जावून हत्येची कबुली दिलीय. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केलाय. विरार पूर्वेच्या भोईर पाडा परिसरात बाळकृष्ण सोसायटीत राहणाऱ्या 62 वर्षीय किशोर फुटणे याने रविवारी सकाळी आपल्या पत्नीची घरात निर्घुणपणे हत्त्या केली आणि तो स्वत: विरार पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि हत्येची कबूली दिली. किशोर फुटणे हा रिक्षा चालक होता. किशोर त्याची पत्नी शुभा (49) आणि एक मुलगा असा परिवार राहत होता. शुभा आणि किशोर यांच्यात मागील काही वर्षापासून वाद सुरु होता. त्याच वादातून ही घटना घडली. रविवारी सकाळी किशोर नेहमीप्रमाणे रिक्षा चालवण्यास गेला असता. तो आपला मोबाईल घरी विसरला होता. दोन तीन भाडे मारल्यानंतर परत घरी आल्यावर त्याला घरात कोणीतरी आल्याचा संशय आला यावरून दोघात जोरदार भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की, त्याने घरातील विळी आणि वरवंट्याने शुभावर हल्ला केला आणि त्यात शुभाचे प्राण गेले.

(वाचा : Mumbai Pune Expresswayवर प्रवास करणार असाल तर हे कायम लक्षात ठेवा! )

त्यानंतर किशोर रक्ताने माखलेल्या अवस्थेत घराबाहेर आला आणि चालत जाऊन त्याने पोलिसांकडे समर्पण केले. किशोर घरातून जाताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाला. पोलिसांनी किशोरला ताब्यात घेऊन चौकशी सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल दबडे यांनी दिली.

तीन वर्षांच्या मुलीला सातव्या मजल्यावरून फेकलं

मुंबईतील कुलाबा परिसरात अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. एका व्यक्तीनं शेजाऱ्याच्या अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला सातव्या मजल्यावरून खाली फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत त्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. चिड आणणारी ही घटना शनिवारी (7 सप्टेंबर) रात्री उशिरा घडली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Loading...

(वाचा : सरपंचाने केलेल्या अपमानामुळे दलित अधिकाऱ्याने केली आत्महत्या)

कुलाबा येथील रेडिओ क्लबजवळच्या अशोका टॉवर इमारतीतील ही घटना आहे. मुलीला खाली फेकल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीनं तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र या घटनेत ती गंभीर जखमी झाली होती. डॉक्टरांनी उपचारांसाठी दाखल करण्यापूर्वी तिला मृत घोषित केलं. आरोपीनं मुलीला इमारतीतून खाली का फेकलं? याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2019 06:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...