मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

बायको स्वत:जवळ झोपू देत नव्हती, रागाच्या भरात पतीनं उचललं टोकाचं पाऊल

बायको स्वत:जवळ झोपू देत नव्हती, रागाच्या भरात पतीनं उचललं टोकाचं पाऊल

बायको जवळ घेत नव्हती म्हणून रागाच्या भरात एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. या घटनेनंतर पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

बायको जवळ घेत नव्हती म्हणून रागाच्या भरात एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. या घटनेनंतर पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

बायको जवळ घेत नव्हती म्हणून रागाच्या भरात एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. या घटनेनंतर पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 17 जुलै : पती-पत्नीच्या भांडणाची अनेक उदाहरणे तुम्ही ऐकली असतील. या भांडणाचे वादाचे रुपांतर अनेकदा वेगवेगळ्या स्वरुपात झाल्याचेही तुम्ही पाहिले असेल. मात्र, मुंबईच्या मालवणीतून पती-पत्नीसंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बायको जवळ घेत नव्हती. याचाच राग अनावर झाल्याने पतीने टोकाचे पाऊल उचलले आहे. तर या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काय आहे घटना - बायको जवळ घेत नव्हती आणि तिच्याजवळ झोपू देत नव्हती म्हणून रागाच्या भरात एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. या घटनेनंतर पतीला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील मालवणीच्या यशोदिप को ऑप सोसायटी, अंदा कॉलनी गेट नं 8 येथे ही धक्कादायक घटना घडली. ज्ञानोबा बलाडे असे आरोपी पतीचे नाव आहे. नेमकं काय घडलं - शुक्रवारी रात्री ज्ञानोबा बलाडे हा पत्नीच्या शेजारी झोपायला गेला होता. मात्र, यावेळी त्याला त्याची पत्नी आपल्याजवळ झोपू देत नव्हती. याच गोष्टीचा राग त्याला अनावर झाला. यानंतर त्याने रागाच्या भरातदगडाचा पाटा पत्नीच्या डोक्यात घालून तिची हत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच याप्रकरणी ज्ञानोबा बलाडे याला पोलिसांनी पत्नीच्या हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे. हेही वाचा - ..अन् आयुष्याच्या कॅमेऱ्यात कैद झाला शेवटचा फोटो; सेल्फी घेताना झाली एक चूक, मुलाचा जागीच मृत्यू दरम्यान, याच परिसरात, पूर्व वैमनस्यातून एका अल्पवयीन मुलाने परिसरातील तरुणाची चाकू भोसकून हत्या केली. ही घटना शनिवारी घडली. तौफीक खान असे मृताचे नाव आहे. आरोपी आणि मृत तरुण या दोघांमध्ये आधीपासून वाद होते, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. मालवणीच्या अंबोजावाडी येथे ही धक्कादायक घटना घडली. तर मागील 24 तासांत याठिकाणी दोन हत्येच्या घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावर आहे.
First published:

Tags: Crime news, Mumbai News, Murder news

पुढील बातम्या