मॉडर्न स्टाइलवरून झाला वाद आणि पतीनं थेट उचललं टोकाचं पाऊल

मॉडर्न स्टाइलवरून झाला वाद आणि पतीनं थेट उचललं टोकाचं पाऊल

पत्नी जीन्स आणि टी शर्ट घालून कामावर जाते म्हणून पतीने पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली

  • Share this:

डोंबिवली, 13 डिसेंबर : पत्नी जीन्स आणि टी शर्ट घालून कामावर जाते म्हणून पतीने पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. डोंबिवली पोलिसांनी पती सुधीर जाधव याला अटक केली आहे.

डोंबिवली नजीक कोपर परिसरातील राहणाऱ्या सुधीर जाधव यांची पत्नी सुजाता जाधव या दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. दोघे नवरा बायको कामाला आहेत. मात्र, पत्नी सुजाता जिन्स आणि टीशर्ट घालते याला पती सुधीर याचा विरोध होता.

जिन्स आणि टी- शर्ट घालते म्हणून सुधीरने तिला वारंवार हटकलं होतं. त्यामुळे त्यांच्या याच कारणास्तव वाद होत होता. सुजाता मंगळवारी रात्री कामावरुन घरी परत आली. कपडय़ावरून परत पती पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला.

सुधीर याने रागाच्या भरात पत्नी सुजाताचा गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पत्नी सुजाता बेशुद्ध पडली.

ती मयत झाल्याचे समजून सुधीर रामनगर पोलीस ठाण्यात हजर झाला. सुधीर घरातून पळून गेल्यानंतर शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले तर सुजाता ही बेशुद्ध पडले अवस्थेत आढळून आली.  शेजाऱ्यांनी सुजाता हिला रुग्णालयात दाखल केलं. तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

 

Published by: sachin Salve
First published: December 14, 2019, 2:10 PM IST
Tags: dombivali

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading