मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुलं नातेवाईकांकडे जाताच साधला डाव; मुंबईत तरुणानं बायकोला दिला भयंकर मृत्यू

मुलं नातेवाईकांकडे जाताच साधला डाव; मुंबईत तरुणानं बायकोला दिला भयंकर मृत्यू

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Murder in Mumbai: नवी मुंबईतील नेरुळ परिसरात एका तरुणानं आपल्या बायकोची निर्घृण हत्या (brutal murder of wife) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी मुंबई, 04 डिसेंबर: नवी मुंबईतील (New Mumbai) नेरुळ परिसरात एका तरुणानं आपल्या बायकोची निर्घृण हत्या केल्याची (brutal murder of wife) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन्ही मुलं नातेवाईकांकडे गेल्याची संधी साधून तरुणानं बायकोचा गळा दाबून निर्घृण हत्या केली आहे. एवढंच नव्हे तर आरोपीनं बायकोच्या माहेरी जाऊन विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न (husband attempt to suicide by drinking poison) देखील केला आहे. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात आरोपी नवऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

कविता वाघ असं हत्या झालेल्या 30 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. तर पती रमेश वाघ असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचं नाव आहे. आरोपी पती रमेश वाघ हा नवी मुंबईतील नेरूळ परिसरातील रहिवासी असून त्याला दारूचं व्यसन आहे. त्याला दोन मुलं देखील आहे. पण दारुच्या आहारी गेल्यानं त्याचं पत्नी कविता वाघ यांच्यासोबत सतत वाद व्हायचा.

हेही वाचा-Beed: पत्नीचे शेजाऱ्यासोबत होते अनैतिक संबंध; कंटाळलेल्या पतीनं उचललं भयावह पाऊल

अगदी क्षुल्लक कारणावरूनही दोघांमध्ये भांडण व्हायचं. दरम्यान घटनेच्या दिवशी गुरूवारी देखील दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. यावेळी संबंधित दाम्पत्याची दोन्ही मुलं देखील घरी नव्हती. दोघंही एका नातेवाईकाच्या घरी गेले होती. याची संधी साधून आरोपी रमेश याने आपल्या बायकोची गळा दाबून निर्घृण हत्या केली आहे. यानंतर त्याने स्वत: पत्नीच्या माहेरी फोन करून हत्येची माहिती दिली आहे. त्यानंतर आरोपी मृत महिलेच्या माहेरी नाशिकला जाऊन विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला आहे.

हेही वाचा-फेसबुकवरील मित्रानं केला घात, आधी रेप केला मग पीडितेच्या वडिलांकडे मागितले 10लाख

पण माहेरच्या लोकांनी तातडीने आरोपी रमेश याला रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी आरोपीवर उपचार केले जात आहेत. तर दुसरीकडे, कविता यांना पतीने मारल्याची माहिती मिळताच त्यांच्या बहिणीनं नेरूळला जाऊन त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. कविता यांचा मृत्यू झाल्याचं कळाल्यानंतर, कविता यांच्या बहिणीनं नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास नेरुळ पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Mumbai, Murder