Home /News /mumbai /

भररस्त्यात पत्नीवर चाकूनं सपासप वार; डोंबिवलीतील थरकाप उडवणारी घटना, कारण समोर

भररस्त्यात पत्नीवर चाकूनं सपासप वार; डोंबिवलीतील थरकाप उडवणारी घटना, कारण समोर

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Crime in Dombivli: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली याठिकाणी एका तरुणाने आपल्या पत्नीवर चाकुने सपासप वार (Knife attack on wife) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली आहे.

    डोंबिवली, 09 फेब्रुवारी: ठाणे (Thane) जिल्ह्यातील डोंबिवली (Dombivli) याठिकाणी एका तरुणाने आपल्या पत्नीवर चाकुने सपासप वार (Knife attack on wife) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी (Wife injured) झाली असून तिच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आरोपी पती फरार झाला आहे. या प्रकरणी डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोमनाथ देवकर असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचं नाव आहे. घटनेच्या दिवशी आरोपीनं चारित्र्याच्या संशयातून आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली होती. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिला पतीविरोधात फिर्याद दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या दिशेनं निघाली होती. यावेळी आरोपीनं पीडित महिलेला भररस्त्यात अडवून तिच्यावर चाकुने सपासप वार केले आहेत. पतीच्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. यानंतर आसपासच्या लोकांनी तिला तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपाचारासाठी दाखल केलं. हेही वाचा-पुणे: भाडेकरूचं मालकीणीवर जडलं प्रेम; अनैतिक संबंधास नकार देताच केलं भयंकर कृत्य या घटनेनंतर डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर पती पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी चारित्र्य आणि चोरीच्या संशयातून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. याच वादातून आरोपीनं पत्नीला बेदम मारहाण केली होती. त्यामुळे पीडित महिला फिर्याद दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या दिशेनं जात होती. हेही वाचा-लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरुणाचा कांड उघड, पोलिसांमुळे वराचं 'हनिमून' लॉकअपमध्ये दरम्यान आरोपीनं पीडित महिलेला भररस्त्यात अडवून तिच्यावर धारदार चाकुने सपासप वार केले आहेत. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर डोंबिवलीतील रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. या प्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Dombivali

    पुढील बातम्या