ठाणे, 20 एप्रिल : राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आतापर्यंत 4500 हून अधिक जणांना कोरोनाची (Covid -19) लागण झाली आहे. राज्यातील मुंबई, पुणे आणि ठाणे (Thane) हे कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. यासाठी राज्यसरकारने कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाण्यातील काही भागांमध्ये 100 टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही नागरिक लाॅकडाऊनचे पालन करत नसल्याचे समोर आल्याने येथील काही भागांत संपुर्ण लाॅकडाऊन जाहीर केला आहे. लोकमान्य नगर, सावरकरनगर प्रभागात संपुर्ण लाॅकडाऊन करण्यात आला असून घराबाहेर पडण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. कारणास्तव बाहेर पडल्यास तुरुंगात रवानगी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
आता इथले नागरिक घराबाहेर पडले तर त्यांना थेट जेलची हवा खावी लागणार आहे. धक्कादायक म्हणजे लोकमान्य नगर येथे एका तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता, तेथे 50 पेक्षा जास्त जणांनी हजेरी लावली होती. त्यामुळे या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव फैलावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. म्हणून लोकमान्य सावरकरनगर प्रभागात 100 टक्के लाॅकडाऊन करण्यात आला आहे. 20 एप्रिल ते 26 एप्रिलपर्यंत सर्व सेवा बंद राहतील. फक्त मेडीकल आणि दुध डेअरी सुरु राहिल. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
लोकमान्य नगरमध्ये काय बंद आणि काय सुरु राहील
- मासळी, मटण, चिकन विक्री बंद
- भाजीपाला, फळ बाजार आणि दुकाने बंद
- दुध, मासळी, चिकन, मटण, भाजीपाला, फळ, बेकरी, अन्नधान्य यांची घरपोच सुविधा बंद
संबंधित -केदारनाथच्या गुरुंना केलं क्वारंटाइन, मुकुट पोहोचवण्यासाठी 1800 KM केला प्रवासधारावीत 24 तासांत 30 नवे कोरोना पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 168 वरधक्कादायक! विलगीकरण कक्षाच्या इमारतीवरुन संशयित रुग्णांनं घेतली उडी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.