...आणि रुग्णांवर उपचार करणाऱ्या कोरोना वॉरियर्सचं संपूर्ण कुटुंब निघालं पॉझिटिव्ह, डॉक्टरांनी सांगितला भयावह अनुभव

...आणि रुग्णांवर उपचार करणाऱ्या कोरोना वॉरियर्सचं संपूर्ण कुटुंब निघालं पॉझिटिव्ह, डॉक्टरांनी सांगितला भयावह अनुभव

रुग्णांवर दिवसरात्र उपचार करणाऱ्या डॉक्टराच्याच संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्यावर डॉक्टरांना काय वाटलं, हा अनुभव वाचून अंगावर काटा येईल.

  • Share this:

मुंबई, 27 मे : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी, हा दर दिवसेंदिवस आता कमी होत आहे. या संकटकाळात फ्रंट लाइनवर काम करणारे कोरोना वॉरियअर्स दिवसरात्र मेहनत करत आहे. आता तर डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागाचे अधिकारी, सफाई कर्मचारी आणि पोलीस यांनाही कोरोनाची लागण होत आहे. यातच मुंबईमध्ये कोव्हिड-19 रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये डॉक्टरांनी आपल्या आपलं दु:ख आणि या संकटाच्या भयंकर रुपाबाबत सांगितले.

'Humans of Bombay' नावाच्या फेसबुकवर पोस्टवर मुंबईच्या एका डॉक्टरांचा कोरोनाबाबतचा अनुभव शेअर करण्यात आला आहे. कोरोनाबाबत डॉक्टर सांगतात की, "कोरोनाच्या संकटात मी एकही दिवस सुट्टी न घेता रुग्णांवर उपचार करत होतो. मला माहित होतं की सध्या रुग्णांना माझी सगळ्यात जास्त गरज आहे. म्हणूनच मी माझं काम करत होतो. रोज 5-10 रुग्णांवर मी उपचार करत होतो, याकाळात स्वत:च्या सुरक्षेचीही काळजी घेतली". मात्र 18 मार्च रोजी या डॉक्टरांना ताप आला आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदललं. डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. भारतात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. 25 मार्चपासून लॉकडाऊनचा पहिला टप्पा सुरू झाला.

वाचा-हॉस्पिटलमध्ये आरोपींनी केला ड्रामा, पोलिसांनी दोघांना पकडलं पण...

डॉक्टरांसोबत त्यांची पत्नी आणि मुलगी यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली. तिघंही कोरोना पॉझिटिव्ह निघाले, त्यानंतर संपूर्ण कुटुंबाला कोव्हिड-19 वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. याबाबत डॉक्टर सांगतात की, "मी माझ्या पत्नीला आणि मुलीला कोव्हिड-19 वॉर्डमध्ये पाहिलं आणि मी हादरून गेलो. स्वत:ला दोष देत राहिलो. एक डॉक्टराच्या नात्यानं रुग्णांसाठी जे काही केलं पाहिजं ते सर्व मी केलं. मात्र कुटुंबाची रक्षा करण्यास कमी पडलो".

वाचा-गेल्या 24 तासांत 6387 नवीन रुग्णांची नोंद, तरी भारतासाठी आनंदाची बातमी

दरम्यान, डॉक्टर आणि त्यांनी मुलगी एका आठवड्यात बरे होऊन घरी परतले. मात्र त्यांच्या पत्नीची तब्येत अजूनही नाजूक आहे, त्या अजूनही रुग्णालयातच आहेत. या परिस्थितीबाबत डॉक्टर सांगतात की, "कोरोनामुळं काही काळासाठी मी माझ्या कुटुंबापासून वेगळा झालो. हा काळ माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. मी माझ्या पत्नीला पाहण्यासाठी आता जास्त वाट नाही पाहू शकत. पण मी शेजाऱ्यांचे आभार मानतो, त्यांनी माझ्या पत्नीच्या जेवणाची काळजी घेतली". असे सांगितले जात आहे, डॉक्टरांच्या पत्नीची चौथी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे आणि त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

वाचा-कोरोनाला हरवण्यासाठी भारत वापरणार नवा फॉर्म्युला, लस नाही तर 'हा' आहे प्लॅन

लॉकाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं

अंगावर काटा डॉक्टरांचा हा अनुभव सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकांनी अशा कोरोना वॉरियर्सना सलाम केलं आहे.