Home /News /mumbai /

Good News: महाराष्ट्रात नागपूरमध्ये होणार COVID-19 लशीची मानवी चाचणी

Good News: महाराष्ट्रात नागपूरमध्ये होणार COVID-19 लशीची मानवी चाचणी

ताप येणं, डोकं दुखणं आणि जाईंट्स दुखणे असे साईड इफेक्ट्सही आढळून आले आहेत.

ताप येणं, डोकं दुखणं आणि जाईंट्स दुखणे असे साईड इफेक्ट्सही आढळून आले आहेत.

कोव्हॅक्सिन असं त्या लशीचं नाव आहे. या चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक आले तर ती भारतासाठी दिलासा देणारी बाब असणार आहे.

मुंबई 18 जुलै: पुण्यातल्या भारत बायोटेक आणि राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेच्यावतीने COVID-19वर लस  तयार करण्यात आली आहे. त्या लशीच्या मानवी चाचणीला देशात सुरुवात झाली आहे. तर महाराष्ट्रात पहिली चाचणी ऑगस्टमध्ये नागपूरला होणार आहे. देशात ज्या 12 सेंटर्सची निवड करण्यात आली त्यात नागपूरच्या एका हॉस्पिटलचाही समावेश आहे. राज्यात आणि देशात कोरोनाचा उद्रेक होत असतानाच देशात कोरोना लशीच्या मानवी प्रयोगांना सुरुवात होणार आहे ही दिलासा देणारी बाब आहे. नागपूर इथल्या डॉ. चंद्रशेख गिल्लूरकर यांच्या गिल्लूरकर हॉस्पिटलची यासाठी निवड करण्यात आली आहे. तिथे ऑगस्ट महिन्यात या चाचण्यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली, रोहतांग, हैदराबाद, पाटणा या 4 ठिकाणी पहिली चाचणी होईल. त्याचे परिणाम पाहून पुढच्या टप्प्यांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्याचबरोबर कानपूर, गोवा, बेळगाव,  चेन्नई, विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर इथल्य सेंटर्सवरही या चाचण्या केल्या जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता कोरोनाच्या विळख्यात, औरंगाबादेत उपचार पहिल्या टप्प्यात 375 जणांवर तर दुसऱ्या टप्प्यांमध्ये 750 जणांवर ही चाचणी होणार आहे. नागपूरमध्ये यासाठी 60 जणांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत सर्व करार झाल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली आहे. हे सर्व निरोगी स्वयंसेवक असून त्यांच्यावर या लशीचे काय परिणाम होतात याचा अभ्यास केला जाणार आहे. कोव्हॅक्सिन असं त्या लशीचं नाव आहे. या चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक आले तर ती भारतासाठी दिलासा देणारी बाब असणार आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या