Elec-widget

बुलेट ट्रेनमुळे मुंबईला फायदा होणार का ?

बुलेट ट्रेनमुळे मुंबईला फायदा होणार का ?

या प्रकल्पातील १२ स्टेशन्सपैकी ८ स्टेशन्स गुजरातेत असल्यानं या प्रकल्प गुजरातच्या बाजूने असल्याचं स्पष्ट झालं होतं.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई

13 सप्टेंबर : बुलेट ट्रेनमुळे मुंबईला, महाराष्ट्राला खरंच काही फायदा होणार का याविषयी सातत्यानं चर्चा होतेय.  याबद्दलचा हा रिपोर्ट...

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची घोषणा झाल्यापासून हा प्रकल्प वादात सापडला आहे. या प्रकल्पातील १२ स्टेशन्सपैकी ८ स्टेशन्स गुजरातेत असल्यानं या प्रकल्प गुजरातच्या बाजूने असल्याचं स्पष्ट झालं होतं.

महाराष्ट्रात येणारी स्थानकं

१) बीकेसी

Loading...

२) ठाणे

३) विरार

४) बोईसर

या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या पदरात या गोष्टी पडतील अशी म्हटले जातंय.

काय मिळू शकेल महाराष्ट्राला

१) बुलेट ट्रेनच्या कामामुळे रोजगार संधी

२) बुलेट ट्रेनच्या कामामुळे त्या मार्गावरील गृहनिर्माण उद्योगाला बळ मिळेल

३) बुलेट ट्रेनच्या मार्गावर लाॅजिस्टिक्स हब तयार होतील

४) या प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यात गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतील

५) मुंबई - अहमदाबाद रेल्वे मार्गावरील भार कमी होईल

या प्रकल्पामुळे मुंबई आणि महाराष्ट्राला काय तोटा होऊ शकेल ?

१) मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी या ओळखीला धक्का पोहोचण्याची शक्यता

२) देशाचा आर्थिक तराजू गुजरातच्या बाजूने झुकल्यास मुंबईच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता

३) आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातमध्ये जाणार

४) हि-याचा व्यापार गुजरातकडे वळण्याची शक्यता

५) या प्रकल्पात मुंबईला चारच स्थानकं पण गुजरात इतकाच २५ टक्के पैसा द्यावा लागणार

कशी असेल बुलेट ट्रेन

१) मुंबई-अहमदाबाद मार्ग: ५०८ किलोमीटर

४६८ किलोमीटर उन्नत मार्ग  

२) किती वेळ लागेल: अंदाजे अडीच तास

३) प्रकल्पाचा खर्च: एक लाख आठ हजार कोटी

४) महाराष्ट्रातील स्थानकं: वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, ठाणे, विरार, बोईसर

५) गुजरातमधील स्थानकं: वापी, बिलिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती

६) काय असेल बुलेट ट्रेनचा वेग: किमान ३२० किमी प्रतीतास

कमाल वेग: ३५० किमी प्रतितास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2017 07:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...