• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • मुंबईत यंदा कसा असेल गणेशोत्सव; मंडळांच्या भूमिकेमुळे ठाकरे सरकारचं टेन्शन वाढणार?

मुंबईत यंदा कसा असेल गणेशोत्सव; मंडळांच्या भूमिकेमुळे ठाकरे सरकारचं टेन्शन वाढणार?

गेल्या वर्षी सर्वच सण-उत्सवांवर कोरोनाचं सावट असल्या कारणाने सर्वत्र अत्यंत साध्या पद्धतीने सेलिब्रेशन झालं. दरम्यान आता राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून तिसऱ्या लाटेचं आव्हान असताना ठाकरे सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष आहे.

 • Share this:
  मुंबई, 23 जून: गेल्या दीड वर्षांहून अधिक काळापासून राज्यभरात कोरोनाच्या परिणामामुळे सर्वंच बाबींवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. अगदी सण-उत्सवदेखील साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून केलं जात आहे. गेल्या वर्षी सर्वच सण-उत्सवांवर कोरोनाचं सावट असल्या कारणाने सर्वत्र अत्यंत साध्या पद्धतीने सेलिब्रेशन झालं. दरम्यान आता राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून तिसऱ्या लाटेचं आव्हान असताना ठाकरे सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष आहे. (Mumbai Ganeshotsav) दरम्यान यंदा गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्तींना उंचीची मर्यादा नसावी, अशी ठाम भूमिका घेतली आहे. कोरोनाचे सर्व निर्बंध पाळले जातील, मात्र मूर्ती उचंच राहतील, याचा पवित्र्यामुळे ठाकरे सरकारचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी गणेश मूर्तींच्या उंचीवर मर्यादा घालण्यात आली होती. परिणामी अनेक मूर्तीकारांचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं. त्यामुळे यंदा राज्य सरकार मदत करेल आणि गणेशोत्सवर साजरा करण्यावर बंधन घालणार नाही, अशी अपेक्षा गणेश मंडळांनी व्यक्त केली आहे. यंदा 10 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. अद्याप उत्सवाला अडीच महिने शिल्लक आहे. मात्र असं असलं तरी मंडप व सजावटीची तयारी आधीच सुरू होते. हे ही वाचा-'आपल्या आमदारासाठी मुख्यमंत्र्यांचा निर्णय वाखण्याजोगा,आव्हाडांचं मोठं विधान काय आहेत गणेश मंडळाच्या मागण्या -गणेश मूर्तींना उंचीची मर्यादा नको -मंडप, ध्वनीक्षेपक परवना ठरलेल्या धोरणानुसार द्यावेत -पीओपीबाबत ठोस निर्णय घेण्यात यावा. -दर्शनासाठी कोरोनाचे नियम पाळून परवानगी द्यावी. -मंडळाच्या जागेत लसीकरणाला परवानगी द्यावी.
  Published by:Meenal Gangurde
  First published: