मुंबई, 07 मार्च : मुंबईत (Mumbai) कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. पण, कोरोनाचे नियम मोडून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) वरळी (Worli) मतदारसंघात मध्यरात्रीपर्यंत पब्ज सुरू असल्याची पोलखोल मनसेनं केली होती. त्यानंतर आता वरळीत मध्यरात्रीपर्यंत अभिनेती दिशा पटानी (Disha Patani) आणि जॉन अब्राहमच्या (John Abraham) सिनेमाच्या शुटिंग सुरू कसे होते, असा आरोप मनसेनं (MNS) केला आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत भरवस्तीत शुटिंग करण्यात आल्याचा आरोप मनसेचे वरळी विधानसभा अध्यक्ष संतोष धुरी यांनी केला आहे. संतोष धुरी यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून थेट आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘...तर त्यांना छडीनं मारा’, केंद्रीय मंत्र्यांनी दिला लोकांना सल्ला
'केम छो वरळीचे मराठी सत्य' असं म्हणत 'युवराजांची दिशा चुकली' असा हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. शुक्रवारी कोळीवाडा इथं संध्याकाळी 5.30 वाजेपासून ते रात्री 12.30 वाजेपर्यंत एका सिनेमाचे शुटिंग सुरू होते. दिशा पटानी आणि जॉन अब्राहम यांच्या सिनेमाचे हे शुटिंग सुरू होते. रात्रीपर्यंत या सिनेमाचे शुटिंग सुरू होते. रात्री 12.30 वाजता शुटिंग बंद करण्यात आले होते. या सिनेमाच्या शुटिंगसाठी कुणाची परवानगी होती, याला कुणाचा आशिर्वाद होता असा सवाल संतोष धुरी यांनी उपस्थितीत केला.
70 फूट खोल दरीत कोसळली कार, 5 ते 6 वेळा झाली पलटी पण तिघे तरुण बचावले, VIDEO
'या ठिकाणी सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला होता. काही जणांना मास्कही वापरले नव्हते. सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय आणि श्रीमंत लोकं, सेलिब्रिटी लोकांना वेगळा न्याय असं का होत आहे. युवराज आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये असा प्रकार घडला आहे. रविवारी पब्जला व्हिडीओ समोर आल्यानंतर सुद्धा जर अधिकारी असा प्रकार घडू देत असतील तर हे निंदनिय आहे', अशी टीका संतोष धुरी यांनी केली.