'दोन तासांत कसं करायचं लग्न?' ट्रोलर्सच्या प्रश्नाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं उत्तर

'दोन तासांत कसं करायचं लग्न?' ट्रोलर्सच्या प्रश्नाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं उत्तर

मोठ्या संख्येने लोक एकत्र जमल्यामुळे संसर्ग पसरण्याची भीती अधिक असते. यामुळे लग्नात सामील होणाऱ्यांवर मर्यांदा लावण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : कोरोनाची रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी सध्या राज्यभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यावेळी राज्य सरकारकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहे. दरम्यान त्यापैकी एक नियमाबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचे अनेक मीम्सही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

कोरोना काळात अनेक लग्नसमारंभ पार पडले. मात्र मोठ्या संख्येने लोक एकत्र जमल्यामुळे संसर्ग पसरण्याची भीती अधिक असते. यामुळे लग्नात सामील होणाऱ्यांवर मर्यांदा लावण्यात आली आहे. इतकचं नाही तर दिवसभर चालणारा लग्नसोहळा केवळ 2 तासात उरकण्याचे आदेश राज्य सरकारकडून नवीन नियमावलीत देण्यात आले आहेत. याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्य सरकारने लागू केलेल्या लग्नाबाबतच्या नियमाबाबत मोठी चर्चा सुरू आहे. 2 तासांत लग्न कसं करायचं असा प्रश्न विचारला जात आहे. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी हे आवश्यक आहे. अनेक जणं 2 तासांत लग्न कसं करायचं असा सवाल करीत आहेत, यावर मी करू काय? असं उत्तर दिलं.

हे ही वाचा-राज्यात आणखी कठोर निर्बंध लावणार का? मुख्यमंत्री म्हणाले...

ऑक्सिजनची सद्यस्थिती

आज राज्यात मेडीकल ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या पाच प्रमुख कंपन्या. तसेच इतर छोटे उत्पादक मिळून राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता 1270 टन इतकी आहे

जेएसडब्ल्यू स्टील यांनी अतिरिक्त 80 मे. टन उत्पादन वाढवले आहे

केंद्र शासनाने निश्चित केलेला कोटा 1784 टन. त्यात राज्यातील व राज्याबाहेरील उत्पादकांचा समावेश

राज्यात सध्या 1650 मेट्रीक टन ऑक्सिजन आवश्यकता.

आजच्या घडीला खालीलप्रमाणे इतर राज्यांतून ऑक्सिजन मिळतोय :

भिलाई, छत्तीसगड 100 टन (Actual allocation 130)

बेल्लारी कर्नाटक 100 टन (Actual allocation 140)

रिलायन्स, गुजरात 100 टन (Actual allocation 125)

Published by: Meenal Gangurde
First published: April 30, 2021, 9:31 PM IST

ताज्या बातम्या