Home /News /mumbai /

Yoga series Episode - 1 : योगासने करण्यापूर्वी warm up exercise कसा कराल, पहा VIDEO

Yoga series Episode - 1 : योगासने करण्यापूर्वी warm up exercise कसा कराल, पहा VIDEO

वाॅर्म

वाॅर्म अप कसे कराल?

व्यक्तीच्या निरोगी आयुष्यासाठी योगासने करणं अत्यंत महत्वाचे असते. पण, योगासने करण्यापूर्वी Warm Up करणे गरजेचे असते. ते वाॅर्म अप करायचे, त्याच्या पद्धती आणि फायदे समजून घ्या.

    मुंबई, 16 जून : माणसांचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी योगासनं (Yoga) अत्यंत महत्वाची आहेत. भारतात महर्षी पतंजली यांना योग पिता मानलं जातात. योगासने केल्यामुळे अनेक आजार, विकार बरे होतात. तसेच शरीरासाहित मनाचे स्वास्थ्य ही तितकेच महत्वाचे आहे. तन आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योग हा एक उत्तम पर्याय आहे. म्हणूनच योगाचे महत्व हे फक्त भरतीयांनीच नाही तर परदेशीयांनी ही मान्य केले आहे. म्हणूनच 21 जून हा 'आंतरराष्ट्रीय योग दिन' (Yoga Day 2022) म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आपण 7 दिवसांची ही सीरिज सुरू करत आहोत. आज आपण योगासने सुरू करण्यापूर्वी 'वाॅर्म अप' महत्वाचा (How to do warm up exercises before doing yoga?) असतो, त्याबद्दल जाणून घेऊ... आजच्या पहिल्या भागात योग किंवा कुठलाही व्यायाम प्रकार करण्यापूर्वी करायचे वॉर्म अप शिकवले आहे. यामध्ये मानेपासून सुरुवात करून मान, हात, खांदे, पाठ, कंबर, पाय, अशा सर्व अवयवांचे वॉर्म अप केले जाते. वाॅर्म अप कसे केले जातात, याचं प्रात्यक्षिक या व्हिडीओमधून दिसते. मानेचा, हाताचा, खांद्यांचा, कंबरेचा आणि पायाचा व्यायाम कसा करावा, यासंबंधी सांगण्यात आले आहे. व्यायाम करून झाल्यानंतर शरीर गरम झालेले असते. ते पुन्हा सामान्य स्थिती आणण्यासाठी शिथिलीकरण करावे लागते. यालाच Relaxation म्हणतात. या पुढील योगासने पुढील भागात एक-एक करून शिकणार आहोत. योगासनाचा इतिहास काय आहे? योगाला 10 हजारापेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. या परंपरेचा उल्लेख नारदीय सुक्त आणि सर्वात प्राचीन अश्या ऋग्वेदामध्ये आढळतो. हा आपणास पुन्हा सिंधू-सरस्वती सभ्यतेचे दर्शन घडवतो. या सभ्यतेमधील पशुपतीनाथांच्या एका नाण्यावर योगमुद्रा विराजमान आहे, जी त्या काळातील योगाच्या व्यापकतेचे द्योतक आहे. अतिप्राचीन उपनिषद बृहद अरण्यक मध्ये योगामधील काही शारीरिक आसनांचा उल्लेख आढळतो. वाचा : Yoga Day 2022: मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी Yoga कराच; पण आसनं करताना घ्या ही काळजी छान्दोग्य उपनिषदामध्ये प्रत्याहारचा तर बृहद अरण्यकमधील एका स्तवनामध्ये प्राणायामचा सविस्तर उल्लेख आहे. प्रचलित योगाच्या स्वरूपाचा प्रथम उल्लेख कठोपनिषदमध्ये आहे, जी आयुर्वेदाच्या कथा शाखामधील अंतिम आठ वर्गांमध्ये पहिल्यांदा येते. जे मुख्य आणि अत्यंत महत्वाचे उपनिषद आहे. येथे योगाला अंतर्मनाच्या यात्रेसाठी तसेच चेतनेच्या विकासासाठी गरजेच्या प्रक्रियेच्या रुपात जाणले जाते.
    First published:

    Tags: Yoga day

    पुढील बातम्या