मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

परवानगी नसताना 'ती' लस फ्रान्सच्या नागरिकांना कशी दिली जाते? नवाब मलिकांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

परवानगी नसताना 'ती' लस फ्रान्सच्या नागरिकांना कशी दिली जाते? नवाब मलिकांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

'हे लसीकरण विदेशातील दुतावास आहेत. विशेषतः फ्रान्स या देशातील नागरिक भारतात व मुंबईत आहेत.

'हे लसीकरण विदेशातील दुतावास आहेत. विशेषतः फ्रान्स या देशातील नागरिक भारतात व मुंबईत आहेत.

'हे लसीकरण विदेशातील दुतावास आहेत. विशेषतः फ्रान्स या देशातील नागरिक भारतात व मुंबईत आहेत.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 13 मे: राज्यात कोरोनावर  (Corona) मात करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. पण  देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना फ्रान्समधील नागरिकांना Moderna ची  लस देण्याचे काम कुठल्या पद्धतीने सुरू आहे. जर जनतेला परवानगी मिळत नाही मग त्यांना विशेष बाब म्हणून परवानगी दिली का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे.

देशभरात लसीकरणाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. 'देशात लशीचा तुटवडा असल्याचे केंद्र सरकार सांगत आहे. केंद्र सरकारने भारत बायोटेक आणि सिरम इन्स्ट्यिट्यूट व स्फुटनिकला परवानगी दिली आहे. असे असताना या देशात आणि मुंबईच्या आजुबाजुला Moderna कंपनीच्या लसीचे लसीकरण सुरू आहे, अशी माहिती उपलब्ध झाल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

VIDEO: SRH च्या आजी-माजी कॅप्टनची मालदीवमध्ये एकत्र धमाल

'हे लसीकरण विदेशातील दुतावास आहेत. विशेषतः फ्रान्स या देशातील नागरिक भारतात व मुंबईत आहेत. त्यांना Moderna ची लस देण्यासाठी काही हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले आहे. दुतावासातील नागरिकांचे भारतीय नातेवाईकांनाही लसीकरण करण्यात येत आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

'तीनच कंपन्यांना परवानगी असताना Moderna ची लस कशी काय दिली जातेय? असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती

दरम्यान, 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करणं महत्वाचं आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण तूर्तास स्थगित करण्यात आलं आहे. दुसरा डोस आधी पूर्ण करावा लागणार आहे. सिरमकडून 20 तारखेनंतर 2 कोटी लस देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. लसींचा पुरवठा होताच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होईल, असं सांगत राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

IPL 2021: मुंबईच्या 'सूर्या'नं सांगितला बॅटिंगचा सिक्रेट WTB मंत्र, पाहा VIDEO

राज्यात रुग्ण वाढीचा दर घसरत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. म्युकरमायसोसिसचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर पत्रकारांच्या लसीकरणासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Corona, Covid-19, Mumbai, NCP