• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • कमला मिल घटनेतील आरोपी दोषमुक्त झालेच कसे? शेलारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कमला मिल घटनेतील आरोपी दोषमुक्त झालेच कसे? शेलारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

29 डिसेंबर 2017 ला कमला मिल कंपाऊंडमधील "वन अबव्ह क्लब" आणि "मोजोस बिस्ट्रो" यांना आग लागून 14 निष्पाप मुंबईकरांचा जीव गेला.

 • Share this:
  मुंबई, 12 नोव्हेंबर : 'कमला मिलमध्ये (kamala mills fire)पबला आग लागून 14 जणांचा मृत्यू झालेल्या घटनेतील 12 आरोपींपैकी प्रथमदर्शनी जे मुळ गुन्हेगार दिसत होते. तेच दोन्ही मिल मालक आरोपमुक्त झाले आहेत, असा आरोप भाजप (BJP) आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. आमदार अँड आशिष शेलार यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून त्यात म्हटले आहे की, 29 डिसेंबर 2017 ला कमला मिल कंपाऊंडमधील "वन अबव्ह क्लब" आणि "मोजोस बिस्ट्रो" यांना आग लागून 14 निष्पाप मुंबईकरांचा जीव गेला. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 12 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हे दाखल केले होते. यातील कंमला मिल कंमाऊडच्या दोन मालक रमेश गोवानी व रवी भंडारी यांनी आरोप मुक्तीसाठी  मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केले होते. न्यायालयात झालेल्या दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर दोन्ही मालकांचे अर्ज मान्य करीत त्यांना आरोप मुक्त केले. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे' असं शेलार म्हणाले. तसंच, 'कंपाऊंडमध्ये एफएसआय घोटाळा झाल्याची शंका आम्ही त्याच वेळेस व्यक्त केली होती चौकशीची मागणी केली, त्यानंतर झालेल्या चौकशीत एफएसआय घोटाळा झाल्याचे समितीने उघड केले होते. घोटाळा ही उघड झाला होता. अशा स्वरूपाची ही गंभीर घटना असून त्यामध्ये 14 निष्पाप मुंबईकरांचा जीव गेले होते. त्यामुळे या घटनेबाबत फौजदारी गुन्ह्यांसह एमआरटीपी कायद्यानुसार सुद्धा कारवाई होणे अपेक्षित आहे' अशी मागणीही शेलार यांनी केली. या घटनेतून प्रथमदर्शनी जे मुळ गुन्हेगार दिसत होते तेच दोन्ही मालक आरोप मुक्त झाले आहेत. त्यामुळे अन्य गुन्हेगारांचे सुटण्याचे मार्ग तर खुले होत नाही ना? पोलीस, महापालिका आणि शासनाने न्यायालयात सक्षमपणे बाजू न मांडल्यास अन्य गुन्हेगार सुद्धा असेच आरोपमुक्त होणार का? असे सवालही शेलारांनी उपस्थितीत केले. मिलच्या जागेत झालेली बांधकामे, त्यातून करण्यात आलेला एफएसआयचा गैरवापर व गैरव्यवहार याला जबाबदार मालकच असताना त्यांना आरोपमुक्त करुन क्लिनचीट कशी मिळाली? मुळ मालक सुटले तर मग एफएसआय घोटाळ्याला जबाबदार कोणाला धरणार? हॉटेलमालक सुद्धा अशाच प्रकारे सुटणार नाही कशावरून? पोलिसांनी केलेल्या तपासानंतर हे मालक सुटले कसे? सरकारी वकिलांनी याबाबत योग्य बाजू मांडली नाही की काय? असेही सवाल शेलारांनी उपस्थितीत केले.
  Published by:sachin Salve
  First published: