Home /News /mumbai /

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून किती खर्च झाला? धक्कादायक माहिती आली समोर

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून किती खर्च झाला? धक्कादायक माहिती आली समोर

माहिती अधिकाराच्या अंतर्गत खात्यात जमा झालेली एकूण रक्कम आणि वाटप केलेल्या रक्कमेचा तपशील मागविला होता. त्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने खर्च झालेली माहिती दिली आहे.

मुंबई, 25 ऑगस्ट : कोरोना परिस्थिती लढा देत असताना राज्य सरकारला आर्थिक संकटाचा मोठा सामना करावा लागला. कोरोनावर मात करण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीची घोषणा करण्यात आली होती. यात सर्वसामान्यांसह ते उद्योगपती, सेलिब्रिटी, राजकीय नेत्यांनी मदत केली. परंतु, जमा झालेल्या निधीतून किती खर्च झाला याची माहिती आता समोर आली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19  खात्यात देणगीदारांच्या मदतीने 541.18 कोटी रुपये जमा करण्यात आले असताना प्रत्यक्षात फक्त 132.25 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आमदार नाराज? बाळासाहेब थोरात म्हणाले... आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत खात्यात जमा झालेली एकूण रक्कम आणि वाटप केलेल्या रक्कमेचा तपशील मागविला होता.  त्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने खर्च झालेली माहिती दिली आहे.  मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एकूण जमा झालेल्या रक्कमेच्या 24.43 टक्के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खर्च केले असून 75.57 टक्के रक्कम अशीच शिल्लक आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे सहाय्यक लेखापाल मिलिंद काबाडी यांनी अनिल गलगली यांना एकूण जमा रक्कम व वाटपाची माहिती दिली. 3 ऑगस्ट 2020 पर्यंत एकूण 541.18 कोटी रुपये जमा झाले आहेत. या रक्कमेपैकी फक्त 132.25 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. खर्च झालेल्या रक्कमेपैकी 20 कोटी रुपये सेंट जॉर्ज हॉस्पिटल, मुंबईला देण्यात आले असून 3.82 कोटी रुपये वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला देण्यात आले आहेत. निम्मा 'महाराष्ट्र' राज ठाकरेंच्या बाजूने, सर्व्हेत लॉकडाउनबद्दल लोकं म्हणतात... औरंगाबाद येथील रेल्वे अपघातातील 16 मजुराला प्रत्येकी 5 लाख रुपये याप्रमाणे मृत व्यक्तीला 80 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. 36 जिल्ह्यात स्थलांतरित मजुरांचे रेल्वेचे भाडे 88.64 इतके दर्शविण्यात आले आहे. जालना आणि रत्नागिरी येथे कोविड लॅबोरेटरीसाठी प्रत्येकी 1.07 कोटी देण्यात आले आहेत तर कोविड रुग्णांच्या प्लाझ्मा उपचारासाठी रु 16.85 कोटी रुपये हे वैद्यकीय शिक्षण विभागास दिले गेले आहे. अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांना पत्र लिहून मागणी केली आहे की,  'पालिका आणि शासकीय रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवांच्या पूर्ततेसाठी जर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 मध्ये जमा झालेली रक्कम खर्च केली गेली तर त्यांचा निधी योग्य कामात वापरल्याचा निश्चितपणे देणगीदारांना दिलासा मिळेल. आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीत भक्कम पैसा असतानाही आर्थिक टंचाईमुळे रुग्णालयातील व्यवस्थापन हे खाजगी लोक आणि स्वयंसेवी ससंस्थेकडून मदतीसाठी विनवण्या करत आहे', ही बाब चिंतेची असल्याची खंत गलगली यांनी व्यक्त केली. मुसळधार पावसामुळे एका क्षणांत डोंगर कोसळला, पाहा LIVE VIDEO कोरोना व्हायरस (साथीच्या रोगाचा) साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी सरकारला मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 28 मार्च 2020 रोजी मुख्यमंत्री मदत निधी कोविड-19 ची स्थापना केली आणि लोकांना पैसे देण्याचे आवाहन केले. या देणग्यांना कलम 80 (जी) अंतर्गत प्राप्तिकर माफी मिळेल. बँक खाते क्रमांक 39239591720 आहे. बँक कोड 00300 आहे आणि आयएफएससी कोड एसबीआयएन 0000300 आहे. अनेक एनजीओ, कॉर्पोरेट्स आणि धार्मिक संस्था संकटावर मात करण्यासाठी राज्याच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी पुढे येत आहेत.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Uddhav Thackey

पुढील बातम्या