Home /News /mumbai /

घातक Omicron सापडलेल्या दक्षिण आफ्रिकेतून किती प्रवासी मुंबईत आले? आदित्य ठाकरेंनी दिली धक्कादायक माहिती

घातक Omicron सापडलेल्या दक्षिण आफ्रिकेतून किती प्रवासी मुंबईत आले? आदित्य ठाकरेंनी दिली धक्कादायक माहिती

'राज्यात पर्यटनासाठी कोणी कुणाला अडवत नाही. पण काळजी घेणं गरजेचं आहे. गेल्या 10 नोव्हेंबरपासून दक्षिण अफ्रिकेतून

'राज्यात पर्यटनासाठी कोणी कुणाला अडवत नाही. पण काळजी घेणं गरजेचं आहे. गेल्या 10 नोव्हेंबरपासून दक्षिण अफ्रिकेतून

'राज्यात पर्यटनासाठी कोणी कुणाला अडवत नाही. पण काळजी घेणं गरजेचं आहे. गेल्या 10 नोव्हेंबरपासून दक्षिण अफ्रिकेतून...

    मुंबई, 29 नोव्हेंबर : दक्षिण आफ्रिकेमध्ये (South Africa) कोरोनाचा घातक असा ओमायक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) आढळला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा कामाला लागली आहे. डोंबिवलीतील (dombivali) एक तरुण दक्षिण आफ्रिकेवरून आला असून कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. पण, हा तरुण दक्षिण आफ्रिकेवरून आलेला एकमेव प्रवासी नसून 10 नोव्हेंबरपासून 1000 प्रवाशी मुंबईत आल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (aditya thackery) यांनी दिली आहे. आदित्य ठाकरे मुंबई महापालिकेत दाखल झाले. ओमायक्रॉन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासोबत आढावा बैठक घेत आहे. याआधी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी शहरातील परिस्थितीबद्दल भाष्य केलं. 'राज्यात पर्यटनासाठी कोणी कुणाला अडवत नाही. पण काळजी घेणं गरजेचं आहे. गेल्या 10 नोव्हेंबरपासून दक्षिण अफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी आले आहे. या सर्व प्रवाशांना ट्रेस केले जात आहे. ते मुंबईत आहेत त्यांची माहिती घेतली जात आहे', अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. कर्मचाऱ्यांवर ही कंपनी झाली उदार! विमानाच्या तिकिटापासून सर्व खर्च उचलणार कंपनी 'शहरात आतापर्यंत  १०२ टक्के लसीकरण पहिला डोस पूर्ण झाले आहे, ७२ टक्के लोकांनी कोरोनाचा लशीचा दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणाच्या वेगासाठी दोन डोस मधील अंतर कमी करणं गरजेचं आहे तशी विनंती केंद्राकडे केली आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. कोरोनाची लाट ओसरली असली तरी धोका अजून टळलेला नाही. दोन-तीन देश आज लॉकडाऊनमध्ये आहेत. शाळा आपण सुरू करत आहोत. पण काळजी घेणं गरजेचं आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. IND vs NZ 1st Test : लास्ट बॉल थ्रिलर! एका विकेटने निसटला टीम इंडियाचा विजय दरम्यान, शनिवारी दक्षिण आफ्रिकेचा केपटाऊन शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती कल्याण डोंबिवली आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार असून त्याला ओमायक्रॉनची लागण झाली आहे का हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्याच्या कुटुंबाची तपासणी उद्या केली जाणार असल्याचे महापालिकेच्या विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितलं. Aadhaar Card हरवलंय? Online असा शोधा आधार नंबर डोंबिवलीमध्ये हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण राहत असून मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारी ही व्यक्ती असून, या व्यक्तीचे लसीकरण झाले नाही. असं असून सुद्धा त्याने विमानाने प्रवास केला आणि लसीकरण न झाल्याने हा तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे वरीष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या