कमला मिल कम्पाऊंडमध्ये रात्रभर चाललेल्या अग्नितांडवाचा घटनाक्रम

कमला मिल कम्पाऊंडमध्ये रात्रभर चाललेल्या अग्नितांडवाचा घटनाक्रम

कमला मिल कम्पाऊंडमध्ये आगीचं तांडव रात्रभर चाललं होतं. सकाळी 6.23ला आग विझवण्यात यश आलं. पाहू या या आगीचा घटनाक्रम

  • Share this:

29 डिसेंबर : कमला मिल कम्पाऊंडमध्ये आगीचं तांडव रात्रभर चाललं होतं. सकाळी 6.23ला आग विझवण्यात यश आलं.  पाहू या या आगीचा घटनाक्रम

रात्री 12.30 वा.

कमला मिलमधील ट्रेड हाऊस इमारतीतल्या मोजो पबला आग

रात्री12.40वा-

अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोचल्या

रात्री12.55वा-

वन अबव्ह या लाऊंजलाही आग लागली

रात्री 1.48 वा.

जखमींना केईएममध्ये केलं दाखल  

रात्री 2 वा.-

ना.म.जोशी पोलीस स्टेशनमध्ये हॉटेल व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल

रात्री 2.03 वा.- केईएम रुग्णालयात आणलेल्यांपैकी 14 जण मृत घोषित

सकाळी 6.23 वा.- आग विझवण्यात यश

वन अबव्ह हा ओपन एअर रूफटॉप लाऊंज होता. मात्र त्याला पूर्णपणे ताडपत्री आणि बांबू स्ट्रक्चरनं कव्हर केलं होतं. हे स्ट्रक्चर अनधिकृत असल्यानं त्याला महापालिकेनं नोटीसही बजावली होती.येण्याजाण्याकरता एकच रस्ता होता आणि तिथे आग लागल्यानं लोकांना बाहेर जाता आलं नाही. त्यातच तिथे उपस्थित असलेल्यांच्या अंगावर संपूर्ण लाकडी स्ट्रक्चर कोसळलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2017 11:15 AM IST

ताज्या बातम्या