कशी लागली कमला मिल कम्पाऊंडमध्ये आग?

जेव्हा आग भडकली त्यावेळी, जळत्या बांबूचा सांगाळा लोकांच्या अंगावर पडल्याची प्राथमिक माहिती आहे. या रेस्टॉरंटचं प्रवेशद्वार अतिशय अरुंद असल्यामुळे लोकांना बाहेर पडण्यास अडथळा निर्माण झाला होता.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 29, 2017 12:17 PM IST

कशी लागली कमला मिल कम्पाऊंडमध्ये आग?

29 डिसेंबर : काल रात्री मुंबईच्या कमला मिल कम्पाऊडमध्ये भीषण आग लागली. या आगीत 14 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. कमला मिलमधली ही आग पहिल्यांदा वन-aboveला की मोजोसला पबला लागली याची  माहिती अजूनही स्पष्ट झाली नाहीये. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचंही सांगण्यात येत आहे. कमला मिल कम्पाऊंड लोअर परेलमधली मोठी मिल आहे त्यामुळे यात लागलेल्या आगीमुळे प्रचंड जीवित आणि वित्तहानी झाली आहे.

कशी लागली आग?

या आगीत सगळं जळून खाक झाल्याने नेमकी आग वन-above लागली की मोजोसला लागली हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. पण या पबवर पावसाळ्यात ताडपत्री आणि बांबूच्या साहाय्याने  रुफ टॉप कव्हर करण्यात आलं होतं. ऑडिओ प्रुफिंगसाठी आतल्या बाजूनं काळ्या कापडाचा वापरही करण्यात आला होता. जेव्हा आग भडकली त्यावेळी, जळत्या बांबूचा सांगाळा लोकांच्या अंगावर पडल्याची प्राथमिक माहिती आहे. या रेस्टॉरंटचं प्रवेशद्वार अतिशय अरुंद असल्यामुळे लोकांना बाहेर पडण्यास अडथळा निर्माण झाला होता. विशेष म्हणजे ६ ते ७ महिन्यांपूर्वीच वन-above सुरु झालं होतं.

काय आहे कमला मिल कम्पाऊंड?

- दक्षिण मुंबईतील अतिशय प्रसिद्ध ठिकाण

Loading...

- अनेक वृत्तवाहिन्या, रेडिओची कार्यालयं

- अत्यंत अलिशान 42 रेस्टॉरंट आणि पब

- दिवसा कार्यालयीन लोकांची वर्दळ

- संध्याकाळी उच्चभ्रू तरुण-तरुणींची गर्दी

- काही सरकारी कार्यालयं आणि बँकाही

भीषण लागलेल्या या आगीत वन-above आणि मोजोस या पब मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या बाबत कसून तपास करतीलच पण ही आग कशी लागली आणि यात सुरक्षा यंत्रणेचे कसे तीन तेरा वाजले यावर न्यूज 18 लोकमतने काही सवाल उपस्थित केले आहेत.

न्यूज18 लोकमतचे सवाल

- कमला मिलमधील दुर्घटनेला जबाबदार कोण?

-  पालिकेनं या रेस्टॉरन्टला परवानगी देताना सुरक्षेचे कोणते निकष लावले?

- पीडितांना वाचवण्यासाठी हॉटेल कर्मचाऱ्यांनी मदत का केली नाही?

- आपत्कालीन दरवाजा कुठे होता?

- हॉटेल्समधील अग्निसुरक्षा यंत्रणा निकामी ठरते का?

- एकाच जागी इतक्या मोठ्या प्रमाणात हॉटेल्सची गर्दी कशासाठी?

- दुर्घटनांमुळे टेरेसवरील हॉटेल संकल्पनेचा पुनर्विचार होणार का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2017 10:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...