...तर राष्ट्रवादी-भाजपचंही सरकार स्थापन होऊ शकतं, काय असू शकतात राज्याच्या राजकारण नवी समीकरणं?
...तर राष्ट्रवादी-भाजपचंही सरकार स्थापन होऊ शकतं, काय असू शकतात राज्याच्या राजकारण नवी समीकरणं?
राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार संकटात आलं आहे. त्यानंतर शिवसेनेनंही आमदारांवर कारवाईसाठी प्रयत्न सुरु आहे. या सर्व घडामोडींदरम्यान राज्याचं राजकारण पुढील काही दिवसात कसं असेल असा प्रश्न अनेकांना पडत आहेत.
मुंबई, 24 जून : राज्यातील राजकीय संकटात वेगवेगळे ट्विस्ट समोर येत आहे. महाविकास आघाडीचं सरकार टिकवण्यासाठी शिवसेनेकडून आणि आता राष्ट्रवादीकडूनही प्रयत्न सुरू आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गुवाहाटीमध्ये शिवसेनेचे 40 आमदार आणि 12 अपक्ष आमदार असल्याचा दावा केला जात आहे. अशात राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार संकटात आलं आहे. त्यानंतर शिवसेनेनंही आमदारांवर कारवाईसाठी प्रयत्न सुरु आहे. या सर्व घडामोडींदरम्यान राज्याचं राजकारण पुढील काही दिवसात कसं असेल असा प्रश्न अनेकांना पडत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील पुढील समीकरण कशी असू शकतात यावर एक नजर टाकूया. दैनिक भास्करने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
महाराष्ट्राचे राजकारण कसं असू शकतं?उद्धव ठाकरेंसमोर सरकारपेक्षा पक्ष वाचवण्यासाठी टेंशन
शिवसेनेचे 55 पैकी 37 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा करत एकनाथ शिंदे यांनी करत पक्ष सोडला नसून, खरी शिवसेना आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. मात्र, शिवसेनेवर दावा करण्यासाठी शिंदे यांना मोठ्या संख्येने खासदारांचा पाठिंबाही लागेल. शिवसेनेचे 17 खासदारही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत असल्याचे समोर येत आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरेंसमोर आता सरकारपेक्षा आपला पक्ष वाचवण्याचे आव्हान आहे.
नवं सरकार किंवा पुन्हा निवडणूक? राज्यातील सत्तासंघर्षात आता फक्त 2 पर्याय शिल्लकफ्लोअर टेस्टची शक्यता
महाराष्ट्रात फ्लोअर टेस्ट होण्याची शक्यता बळावली आहे. आता दोन्ही गटांना आपले बहुमत सिद्ध करायचे आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सरकार टिकेल की नाही, हे फ्लोअर टेस्टमधूनच कळेल, असे म्हटले होते. काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांकडूनही फ्लोअर टेस्ट होणार असल्याची चर्चा आहे.
विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागेल
महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि राज्यपाल दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. राज्यपालांना दक्षिण मुंबईतील रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सभागृह बरखास्त करण्याची शिफारस केली, तर राज्यपाल बहुमत सिद्ध करा, असे सांगू शकतात, त्यानंतर शिफारशीचा विचार केला जाईल. सभागृहात बहुमत सिद्ध करता आले तर सभागृहाची बैठक बोलावावी लागेल. बहुमत आहे की नाही हे सभागृहातच ठरवले जाईल.
एकनाथ शिंदे भाजपसोबत सरकार स्थापन करू शकतात
शिवसेनेचे 37+3 (संभाव्य) आणि 9+5 (संभाव्य) अपक्ष आमदारांसह एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करू शकतात. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होऊ शकतात.
'तुमच्या कारवाईच्या मागणीचा परिणाम आमदारांवर होणार नाही'; एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारणमहाराष्ट्रात लागू होऊ शकते राष्ट्रपती राजवट
घटना तज्ज्ञांच्या मते, एकनाथ यांना 37 आमदारांचा आकडा गाठता आला नाही, तर पक्षही त्यांच्या हाताबाहेर जाईल आणि त्यांचे सदस्यत्वही रद्द होईल. अशा स्थितीत ना उद्धव ठाकरेंकडे बहुमत असेल ना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि घटनेच्या कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाही.
बंडखोर आमदार राजीनामे देऊ शकतात
शिवसेनेचे बंडखोर आमदार राजीनामे देऊ शकतात आणि पोटनिवडणुकीत हे आमदार भाजपच्या तिकीटावर निवडणुकीत उतरतील. ते जिंकले तर भाजपचे सरकार स्थापन होऊ शकेल. काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर (JDS) आमदारांनी एकामागून एक राजीनामे देण्यास सुरुवात केली असताना कर्नाटकमध्येही अशीच स्थिती निर्माण झाली होती.
एकनाथ शिंदेंच्या सर्व अटी एकनाथ ठाकरेंनी मान्य केल्या
उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या सर्व अटी मान्य करून भाजपसोबत जातील अशीही शक्यता आहे. या स्थितीत देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्रीपद मिळणार आहे. मात्र ही शक्यता कमी दिसते.
राष्ट्रवादी-भाजपचेही सरकार स्थापन होऊ शकते
गेल्या तीन दिवसांतील घडामोडी पाहता राष्ट्रवादीच्या कोट्यातील अजित पवार, छगन भुजबळ आणि जयंत पाटील या मंत्र्यांनी सद्यस्थितीला भाजपला जबाबदार धरलेले नाही. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत ते भाजपला क्लीन चिट देत आहेत. राष्ट्रवादीचे काही बडे नेते भाजपच्या केंद्रीय पथकाच्या संपर्कात असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन करू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.