हँडसम चोरटा : मॉडेलिंगसाठी आला होता चंदेरी दुनियेत; पोहोचला तुरुंगात

चंदेरी दुनियेत राहणे, खाणे-पिणे राहुलच्या खिशाला परवडत नसल्यामुळे त्याने झटपट पैसे मिळवण्यासाठी अखेर चोरीचा मार्ग स्वीकारला.

News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2019 08:28 PM IST

हँडसम चोरटा : मॉडेलिंगसाठी आला होता चंदेरी दुनियेत; पोहोचला तुरुंगात

मुंबई,11 ऑक्टोबर: मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका हँडसम चोरट्याला अटक केली आहे. त्याचा 'प्रताप' ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. त्याने एक-दोन नव्हे तब्बल 50 पेक्षाजास्त घरफोड्या केल्या आहेत.

राहुल रामसिंग थापा (वय-44) असे या चोरट्याचे नाव आहे. तो मूळचा नेपाळी नागरिक आहे. तो मुंबईत मॉडेलिंगच्या क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी आला होता, मात्र त्याला नशिबाने साथ दिली नाही. म्हणून पैसे कमवण्यासाठी तो दिवसाढवळ्या घरफोड्या करायला लागला. पवई पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर घरफोडीचे 20 गुन्हे दाखल आहेत तर नवी मुंबईत 30 पेक्षाही अधिक घरफोड्यांची नोंद आहे.

वडील होते वॉचमन..

राहुलचे वडील दादरमधल्या शिवाजी पार्क येथील एका सोसायटीत वॉचमन होते. राहुल वडिलांना भेटण्यासाठी अधूनमधून मुंबईत येत होता. राहुलला या चंदेरी दुनियेने आकर्षित केले. तो मॉडेलिंग क्षेत्रात करियर करण्यासाठी 2003 मध्ये मुंबईत आला होता. मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावण्यासाठी त्याने खूप परिश्रम घेतले, मात्र, त्याला नशीब साथ दिली नाही.

चंदेरी दुनियेत राहणे, खाणे-पिणे राहुलच्या खिशाला परवडत नसल्यामुळे त्याने झटपट पैसे मिळवण्यासाठी अखेर चोरीचा मार्ग स्वीकारला. ज्या हाऊसिंग सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरा नाही, अशा ठिकाणी जाऊन राहूल दिवसाढवळ्या घरफोड्या करत होता. पवई पोलिसांनी त्याला चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्याच्या विरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचे 20 गुन्हे दाखल आहेत. जामिनावर बाहेर आल्यानंतर राहुलने आपला गोरखधंदा सुरूच ठेवला. त्यात त्याचे लग्न झाले. तो नवी मुंबईतील ऐरोली येथे पत्नीसोबत राहत होता. जोडधंदा म्हणून तो पब, डान्सबारमध्ये डीजेचे काम करत होता. एका फ्लॅटमध्ये चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना राहुल पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिस चौकशीत त्याने सुमारे 50 पेक्षाही अधिक घरफोडी केल्याची कबुली दिली.

Loading...

माईंड इट...,मोदींचा खास दाक्षिणात्य लूक, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2019 08:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...