आता हाॅटेल्स,पब्स,क्लब 24 तास सुरू

आता हाॅटेल्स,पब्स,क्लब 24 तास सुरू

व्यावसायिक विभागातील हॉटेल्स, पब, क्लब, रेस्तराँ अशा आस्थापनांना २४ तास सुरू ठेवण्यासंदर्भात परवानगी दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत स्पष्ट केले.

  • Share this:

मुंबई, 11 आॅगस्ट : मुंबईतील निवासी भागातील दुकाने, हॉटेले, पब, क्लब, रेस्तराँ २४ तास सुरू ठेवण्याबाबत परवानगी देण्यात येणार नाही. मात्र, व्यावसायिक विभागातील हॉटेल्स, पब, क्लब, रेस्तराँ अशा आस्थापनांना २४ तास सुरू ठेवण्यासंदर्भात परवानगी दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत स्पष्ट केले.

मुंबई आस्थापना विधेयक गुरुवारी रात्री विधानसभेत मंजूर झाले.  मुंबईसह राज्यभर अनेक बंधनेही सरकारने टाकली आहेत. कोणत्या भागात कोणत्या आस्थापना किती वेळ सुरू ठेवायच्या याचा अधिकार पोलीस विभागाला असेल. त्यासाठी पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागेल. ज्या आस्थापनांमध्ये ५० पेक्षा अधिक महिला काम करतात त्या ठिकाणी पाळणाघराची व्यवस्था मालकांना करावी लागेल. शंभरहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी कँटिनची व्यवस्था करणे अनिवार्य असेल.

महिला कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचविण्याची जबाबदारी ही आस्थापना मालकांची असेल. तसेच प्रत्येक आस्थापनेत सीसीटीव्ही लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2017 11:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading